Home महाराष्ट्र कृतज्ञता’पाणी ठेवा, पक्षी वाचवा’; राहत्या घरी दाणे, पाणी ठेवण्याचे आवाहन

कृतज्ञता’पाणी ठेवा, पक्षी वाचवा’; राहत्या घरी दाणे, पाणी ठेवण्याचे आवाहन

7
0

‘त्या’ जीवांची तहान फक्त दोन थेंब पाण्याची

उन्हाच्या झळा जाणवू लागल्या असून, पक्ष्यांना सध्या कडक उन्हाचा फटका बसणे सुरु झाले आहे. उन्हाची तीव्रता दिवसागणिक वाढत असून, प्रत्येकाने पक्ष्यांसाठी पाण्याची व्यवस्था करावी, उन्हाळ्यात अन्न पाण्यासाठी पक्ष्यांची होणारी भटकंती थांबविण्यासाठी परिसरातील नागरिकांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. गत दहा वर्षांमध्ये परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षतोड झाली. त्यामुळे पक्ष्यांची संख्या कमी झाली आहे. मात्र जेवढे पक्षी आपल्या परिसरात असतील, त्यांचे दिसत अस्तित्व टिकविण्यासाठी आणि उन्हाळा सुसह्य करण्यासाठी नागरिकांनी पक्षासाठी पाण्याची भांडी ठेवावीत, असे आवाहन पक्षीमित्रांच्यावतीने करण्यात येत आहे. पक्ष्यांसाठी घराबाहेर पाणी व अन्न ठेवा, असे संदेश सोशल मीडियावर फिरु लागतात. परंतु संदेश पाठविणाराच पक्ष्यांसाठी पाणी ठेवत नाही, ही एक मोठी शोकांतिकाच आहे. सध्यस्थितीत पक्षी कमी होऊ लागले असून प्रत्येकाने जबाबदारी ओळखून राहत्या घरी, जमेल या ठिकाणी पक्षाच्या दाना-पाण्याची सोय करणे गरजेचे असल्याचा सुर उमटत आहे. पक्षी निसर्ग चक्रातील एक महत्वपूर्ण घटक असून त्याची मदत करणे हे आपले कर्तव्य आहे, नाल्याचे पात्र कोरडे पडू लागल्याने नागरिकांनी मानवतावादी दृष्टिकोन बाळगावा सिमेंट काँक्रिटच्या रस्त्यामुळे उष्णतेचे – प्रमाण चांगलेच वाढल्याने याचाच त्रास पक्ष्यांना होत आहे. दरम्यान त्यांना पाण्यात भिजावे लागते व महत्वाचे म्हणजे, पिण्यासाठी यांना पिण्याच्या पाण्याची नितांत गरज आहे. त्यामुळे नागरिकांनी मानवतावादी दृष्टिकोनातून अंगणात, घराच्या टेरेसवर, कम्पाउंडवॉलवर पाण्याचे भांडे ठेवणे गरजेचे आहे. पक्ष्यांना शाश्वत असे जलसाठे तुरळक आहेत. त्यामुळे पक्ष्यांची पाण्यासाठीची भटकंती टाळण्यासाठी शेगांव वासीयांनी यांच्यासाठी पिण्याच्या पाण्याची व दोन दाणे अन्नाची व्यवस्था करावी.
नगरसेवक अंबादास उर्फ प्रमोद बळीराम इंगळे

Previous articleजागतिक महिला दिनानिमित्त प्रभाग ९ मध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम
Next articleएकफळ येथे संगीतमय श्रीमद्भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here