Home महाराष्ट्र गो ग्रीन फाऊंडेशन शेगावच्या वतीने नवनिर्वाचित मा नगराध्यक्ष आणि मा नगरसेवक यांचे...

गो ग्रीन फाऊंडेशन शेगावच्या वतीने नवनिर्वाचित मा नगराध्यक्ष आणि मा नगरसेवक यांचे अभिनंदन पत्र व वृक्ष देऊन स्वागत .

6
0

शेगाव – नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक कार्यक्रमांमध्ये संतनगरी शेगाव येथील नगरपरिषदेच्या निवडणुकीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये आणि निर्विघ्नपणे पार पडला. यामध्ये नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांची आश्र्वासित विकासकामे लक्षात घेऊन नागरिकांनी प्रचंड मतांनी निवड केलेली आहे. मा नगराध्यक्ष आणि नगरसेवक आपले नियोजित संकल्पित विकास कामे घेऊन या निवडणुकीमध्ये समोर आलेले होते. आणि ते आपले संकल्पित विकास कामे की, जेणेकरून संतनगरी शेगावच्या वैभव मध्ये भर पडणार आहे अशी कामे करणार आहेत म्हणून गो ग्रीन फाउंडेशन शेगावच्या वतीने सर्व नवनिर्वाचित मा नगरसेवकांचे आणि नवनिर्वाचित मा नगराध्यक्षांचे त्यांच्या निवासस्थानी जाऊन अभिनंदन पत्र व वृक्ष देऊन सत्कार घेण्यात आला. यामागे उद्देश हाच आहे की पुढील पाच वर्षांमध्ये संतनगरी शेगावच्या वैभवामध्ये भर टाकण्यासाठी नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या खांद्याला खांद्या लावून संतनगरी शेगाव मध्ये पर्यावरण पूरक उपक्रम आणि प्लास्टिक मुक्त शेगाव करण्यासाठी एकमेकांना सहकार्य करून पर्यावरण संवर्धन कसे होईल आणि संत नगरी शेगावच्या वैभवा मध्ये कशी भर पडेल हा उद्देश ठेवून गो ग्रीन फाउंडेशन आणि नवनिर्वाचित नगराध्यक्ष आणि नगरसेवक यांच्या संयुक्त विद्यमाने पुढील पाच वर्षांमध्ये संत नगरीचा कायापालट करण्याच्या उद्देशाने हा सत्कार करण्यात आला.गो ग्रीन फाऊंडेशन शेगाव गेल्या सात वर्षांपासून निस्वार्थपणे वृक्षारोपण व वृक्ष संवर्धन आणि पर्यावरण पूरक उपक्रम राबवून पर्यावरण संवर्धनांमध्ये आपला खारीचा वाटा उचलत आहे. नवनिर्वाचित मा. नगराध्यक्ष आणि मा. नगरसेवक यांच्याकडून एवढीच अपेक्षा आहे की त्यांनी अनेक पर्यावरण पूरक उपक्रम राबवून आणि संतनगरी शेगाव प्लास्टिक मुक्त कशी होईल याबाबत गो ग्रीन फाउंडेशन ला सहकार्य करावे आणि एकमेकांना सहकार्य करून संत नगरी शेगावच्या विकासात भर घालावी.

Previous articleस्त्रीशिक्षणाच्या जननीचा रणघोष!
Next articleमहाराष्ट्रात ५९ व्या निरंकारी संत समागमाची पूर्व तयारी उत्साहपुर्वक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here