Home महाराष्ट्र जय बजरंग क्रीडा मंडळ, वडगाव (वान) आयोजित एक दिवसीय कबड्डी खुली दणदणीत...

जय बजरंग क्रीडा मंडळ, वडगाव (वान) आयोजित एक दिवसीय कबड्डी खुली दणदणीत स्पर्धा

16
0

वडगाव (वान), ता. संग्रामपूर, जि. बुलढाणा येथे जय बजरंग क्रीडा मंडळ यांच्या वतीने स्व. प्रकाश काकडे, स्व. दिनेशराव बाघ व स्व. मंगेश कुटे यांच्या पावन स्मृतिप्रीत्यर्थ तीन दिवसीय कबड्डी खुल्या दणदणीत सामन्यांचे भव्य आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा शनिवार व रविवार, दिनांक 27 व 28 डिसेंबर 2025 रोजी जिल्हा परिषद शाळा, वडगाव (वान) येथे आयोजित करण्यात आली आहे.

या भव्य कबड्डी स्पर्धेत बुलढाणा जिल्ह्यासह विदर्भातील विविध भागांतील नामवंत व ताकदवान कबड्डी संघ सहभागी होणार असून कबड्डीप्रेमींना अत्यंत चुरशीचे, थरारक व रोमांचक सामने पाहण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे. ग्रामीण भागातील युवकांना खेळाची संधी मिळावी, त्यांच्यातील कला व गुणवत्ता पुढे यावी तसेच कबड्डी या पारंपरिक खेळाचा विकास व्हावा, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

स्पर्धेसाठी प्रवेश फी 1000 रुपये तर तक्रार फी 1500 रुपये ठेवण्यात आली आहे. आयोजकांनी विजेत्या संघांसाठी आकर्षक रोख बक्षिसांची घोषणा केली असून –
🔹 प्रथम बक्षीस : ₹41,001
🔹 द्वितीय बक्षीस : ₹31,001
🔹 तृतीय बक्षीस : ₹21,001
🔹 चतुर्थ बक्षीस : ₹11,001

तसेच वैयक्तिक उत्कृष्ट कामगिरीसाठी
🏆 बेस्ट रेडर : ₹2,101
🏆 बेस्ट डिफेंडर : ₹2,101
अशी विशेष पारितोषिकेही देण्यात येणार आहेत.

स्पर्धेचे उद्घाटन मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत करण्यात येणार असून तीनही दिवस सामने अधिकृत पंच समितीच्या मार्गदर्शनाखाली व कबड्डी फेडरेशनच्या नियमांनुसार खेळविण्यात येणार आहेत. या स्पर्धेच्या यशस्वी आयोजनासाठी आयोजन समिती, पंच समिती व स्थानिक ग्रामस्थ परिश्रम घेत आहेत.

तरी परिसरातील सर्व कबड्डीप्रेमी नागरिकांनी, युवकांनी व खेळाडूंनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या तीन दिवसीय कबड्डी महोत्सवाचा आनंद घ्यावा व खेळाडूंना उत्स्फूर्त प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन जय बजरंग क्रीडा मंडळ, वडगाव (वान) यांच्या वतीने करण्यात आले आहे.

Previous articleप्रहार तालुकाध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे यांच्या हद्दपारीप्रकरणी विभागीय आयुक्तांचा मोठा आदेश – प्रकरण 30 दिवसांत नव्याने निकाली काढण्याचे निर्देश
Next articleएकलव्य इंग्रजी निवासी शाळेत प्रवेशासाठी 30 जानेवारीपर्यंत अर्ज करावा; एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here