Home महाराष्ट्र जागतिक महिला दिनानिमित्त प्रभाग ९ मध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम

जागतिक महिला दिनानिमित्त प्रभाग ९ मध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम

16
0

जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्री गोरक्षण संस्थान, शेगाव येथे प्रभाग क्रमांक ९ च्या नगरसेविका सौ. सुषमाताई राजेंद्र भाऊ भिसे यांच्या आयोजनातून वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला.“झाडे लावा, झाडे जगवा” हा संदेश देत पर्यावरण संवर्धनासाठी हा उपक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात विविध प्रकारच्या वृक्षांची लागवड करून पर्यावरण रक्षणाचा संकल्प करण्यात आला.नगरसेविका सौ. सुषमाताई भिसे यांनी यावेळी नागरिकांना अधिकाधिक झाडे लावण्याचे तसेच त्यांचे संवर्धन करण्याचे आवाहन केले. पर्यावरण संतुलन राखण्यासाठी वृक्षारोपण ही काळाची गरज असल्याचे त्यांनी सांगितले.या उपक्रमात प्रभागातील नागरिक, महिला तसेच कार्यकर्त्यांनी उत्स्फूर्त सहभाग घेत वृक्षारोपण करून पर्यावरण संरक्षणाचा संदेश दिला. कार्यक्रमाचे सर्वत्र कौतुक होत आहे. 🌱🌿

Previous articleफिटनेस क्लबमध्ये चित्रकार रवी इंगळे यांचा गुणगौरव
Next articleकृतज्ञता’पाणी ठेवा, पक्षी वाचवा’; राहत्या घरी दाणे, पाणी ठेवण्याचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here