Home महाराष्ट्र जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती गठीत

जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती गठीत

15
0

बुलढाणा,

जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी डॅा. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली बुलढाणा जिल्हास्तरीय माध्यम प्रमाणन व संनियंत्रण समिती गठीत करण्यात आली आहे.

या समितीमध्ये जिल्हाधिकारी डॅा.किरण पाटील हे अध्यक्ष म्हणून कार्यरत राहणार आहेत. तसेच बुलढाणाचे उपविभागीय अधिकारी, अपर पोलीस अधीक्षक अमोल गायकवाड, दैनिक दिव्य मराठीचे जिल्हा प्रतिनिधी लक्ष्मीकांत बगाडे, साम टिव्हीचे जिल्हा प्रतिनिधी संजय जाधव, मराठी पत्रकार परिषदेचे प्रदेश प्रतिनिधी गणेश निकम, डिजीटल मिडीया परिषदेचे अध्यक्ष गणेश सोळंकी हे या समितीचे सदस्य म्हणून कार्यरत राहणार आहेत. जिल्हा माहिती अधिकारी पवन राठोड हे या समितीचे सदस्य सचिव म्हणून कार्यरत राहणार आहेत.

Previous articleबुलडाणा सायबर पोलीसांची मोठी कामगिरी; ‘डिजिटल अरेस्ट’ फसवणूक प्रकरणातील 10 लाखांपैकी 9.94 लाख रुपये परत
Next articleनगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here