35 वर्षानंतर वर्गमित्र आले एकत्र

शेगाव,;– स्थानिक नगरपरिषदेतील युवा व अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणून ओळख असलेले नगरसेवक शैलेन्द्र महादेवराव पाटील (उर्फ शैलू) यांचा त्यांच्या शालेय मित्रमंडळींकडून आपला बालमित्र नगरसेवक पदावर वीराजमान झाल्याबद्दल सत्कार करीत खास “गेट-टुगेदर” स्नेहमेळावा उत्साहात पार पडला
दि. २८ फेब्रुवारी रोजी शेगाव येथील हॉटेल आठवण येथे संध्याकाळी सात वाजता सर्व वर्गमित्र एकत्र येत स्नेह मिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला 1985 ते 1990 पर्यंत राष्ट्रमाता इंदिरा गांधी मुन्सिपल हायस्कूल येथे सोबत शिक्षण घेतलेल्या १०वीतील वर्ग मित्रांची 35 वर्षानंतर एकत्र येण्याचा खास योग सत्कार निमित्त आला या कार्यक्रमाला सुमारे ३० ते ३२ वर्ग मित्रांची उपस्थिती लाभली.
वर्ग,मित्रपरिवारामध्ये प्रेमाने “शैलू” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक शैलेन्द्रदादा पाटील यांच्या सन्मानार्थ आयोजित या कार्यक्रमात आपुलकी, उत्साह आणि जुन्या आठवणींचा भावनिक संगम अनुभवायला मिळाला. शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
अल्पवयातच राजकारणात सक्रिय होत त्यांनी समाजकार्यात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. शेगाव नगरपरिषदेच्या सुरुवातीच्या काळातील सर्वात तरुण नगराध्यक्ष म्हणून त्यांनी कार्य केले. त्यांच्या नेतृत्वाखाली पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते विकास ,विशेषतः श्री गजानन महाराजांच्या समाधी शताब्दी निमित्य शेगांव तीर्थ क्षेत्र विकास आराखडा संपूर्ण अभ्यास करीत असताना पारदर्शकपणे राबविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला तसेच विविध नागरिकाभिमुख योजना प्रभावीपणे राबविण्यात आल्या. प्रशासनातील पारदर्शकता, कार्यक्षमता आणि लोकाभिमुख दृष्टिकोनामुळे त्यांना नागरिकांचा विशेष विश्वास संपादन करता आला आहे याचा सार्थ अभिमान असल्याचे वर्ग मित्रांनी स्पष्टीकरण दिले
चौकट — चांगले मित्रच माझी खरी ताकद:– शैलेंद्रदादा पाटील
माझ्या आयुष्यातील सर्वात मोठी ताकद म्हणजे माझे मित्र परिवार आजही आपण मला ‘शैलू’ म्हणून हाक मारता, हीच माझ्यासाठी खरी संपत्ती आहे. आपल्या सर्वांच्या प्रेमामुळेच मी समाजकार्य अधिक जोमाने करू शकतो. व पुढेही आपल्या सर्वांच्या सहकार्याने चांगले कार्य करू असा विश्वास सत्काराला उत्तर देताना माझी नगराध्यक्ष तथा नगरसेवक शैलेंद्रदादा पाटील यांनी व्यक्त केला
या कार्यक्रमात विविध मनोरंजनात्मक उपक्रम, स्नेहभोजन व सामूहिक छायाचित्रणाचा आनंद घेण्यात आला. अनेक वर्षांनंतर सर्व मित्र एकत्र आल्याने वातावरणात हसरे संवाद, शाळेतील त्या जुन्या आठवणींची उजळणी आणि भावनिक क्षण अनुभवायला मिळाले. भविष्यातही अशा स्नेहमेळाव्यांचे आयोजन करण्याचा सर्वांनी एकमताने निर्धार व्यक्त केला.
कार्यक्रमास एड. श्रीकांत शेळके, विनोद लुक्कड, संदीप चांडक, अविनाश पाटील, संतोष रायने,भीमराव वानखेडे, संदीप नावकर, गणेश कराळे, मंगेश बानोले, एस. एन. देशमुख, सचिन सिंगीरकर, गजानन कराले, गणेश अरबट, शरद साळुंखे, राजू देशमुख, सतिश कराळे, जय माटा, विजय बजाज, दिनेशबाप्पू देशमुख, निलेश कलोरे, रामनारायण राठी, दिगंबर शेजोळे, गजानन घाटोळ, सचिन अग्रवाल, प्रमोद नागलकर, योगेश कंकाळ, विठ्ठल पोटे या सह इतर शालेय मित्र उपस्थित होते.
हा स्नेहमेळावा मैत्री, एकजूट आणि समाजकार्याच्या प्रेरणेचा सुंदर संगम ठरला असल्याची भावना सर्व वर्ग मित्रांनी व्यक्त करून दाखवली









