Home महाराष्ट्र पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीद जवानांना अभिवादन; जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली

पोलीस स्मृती दिनानिमित्त शहीद जवानांना अभिवादन; जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी वाहिली श्रद्धांजली

24
0

दरवर्षीप्रमाणे यंदाही 21 ऑक्टोबर रोजी पोलीस स्मृती दिन उत्साहपूर्वक आणि भावपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. या निमित्ताने आज बुलडाणा जिल्हा पोलीस मुख्यालयात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी किरण पाटील यांनी शहीद पोलीस जवानांच्या स्मारकाला पुष्पचक्र अर्पण करून त्यांना श्रद्धांजली वाहिली.

या प्रसंगी पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अप्पर पोलीस अधीक्षक श्रेणिक लोढा, पोलीस उपविभागीय अधिकारी सुधीर पाटील तसेच जिल्ह्यातील विविध पोलीस अधिकारी, कर्मचारी आणि पोलीस दलाचे निवृत्त अधिकारी उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली. त्यानंतर शहीद जवानांची नावे वाचून दाखवण्यात आली आणि दोन मिनिटे मौन पाळून त्यांना आदरांजली अर्पण करण्यात आली. त्यानंतर जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी परिसरातील पाहणी करून शस्त्र विषयी माहिती घेतली.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी शहीद जवानांना सलाम करत “भारत माता की जय” या घोषणांनी परिसर दुमदुमला.

Previous articleआपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मोठा दिलासा : 2 लाख 75 हजार शेतकऱ्यांच्या खात्यात 185 कोटींचा मदतनिधी जमा
Next articleअमरावती येथिल विभागिय आयूक्त कार्यालय येथे चालू असलेल्या अन्नत्याग उषोणावर प्रहार ता अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे नऊव्या दिवशि ही ठाम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here