Home महाराष्ट्र फिटनेस क्लबमध्ये चित्रकार रवी इंगळे यांचा गुणगौरव

फिटनेस क्लबमध्ये चित्रकार रवी इंगळे यांचा गुणगौरव

15
0

कलेतून जागवली शिवप्रेरणा

शेगाव : स्थानी शहरातील तरुणांना प्रेरणा देणाऱ्या कलाकृतीमुळे चित्रकार रवी इंगळे यांचा येथोचित सत्कार करण्यात आला. श्री संत गजानन महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रभावी, चित्र रेखाटल्याबद्दल माजी नगराध्यक्ष तथा विद्यमान नगरसेवक शैलेंद्रदादा पाटील यांनी त्यांचा ५१०० रुपयांचे रोख बक्षीस, शाल व श्रीफळ देऊन यथोचित सन्मान केला.
या सत्कार समारंभाचे आयोजन शहरातील गांधी चौक मधील (F.C.जिम)फिटनेस क्लबमध्ये दिनांक ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता सर्व सदस्यांच्या उपस्थितीत करण्यात आला. या उपक्रमामागे आर्किटेक्ट निखिल बावस्कार यांची संकल्पना होती. सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता प्रवीण पुंडकर व डॉ अविनाश सोळंके यांच्या हस्ते चित्रकार रवी इंगळे यांचा सत्कार करण्यात आला.
फिटनेस क्लबच्या समोरील श्रवगी यांच्या भिंतीवर साकारलेले छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य दिव्य चित्र जिममध्ये व्यायामासाठी येणाऱ्या तरुणांना पराक्रम देशभक्ती, शौर्य आणि स्वाभिमानाची प्रेरणा देत आहे. या चित्रामुळे परिसरातील तरुणांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली असून अनेकांनी या कलाकृतीचे कौतुक केले.
यावेळी उपस्थितांनी सांगितले की, रवी इंगळे यांची कला ही केवळ चित्रकलेपुरती मर्यादित नसून ती समाजाला प्रेरणा देणारी आहे. त्यांच्या कुंचल्यातून साकारलेली शिवरायांची प्रतिमा तरुणांमध्ये जिद्द आणि आत्मविश्वास जागवणारी ठरत आहे.
या प्रसंगी शहरातील अनेक मान्यवर व तरुण उपस्थित होते. शेगावच्या तरुणाईने एकत्र येत चित्रकार रवी इंगळे यांच्या कलेचा सन्मान करून कलावंताला योग्य दाद दिली, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. या वेळी
शैलेंद्रदादा पाटील ,विक्रांतदादा
पाटील ,इंजि. प्रवीण पुंडकर ,डॉ अविनाश सोळंके, निखिलदादा पाटील ,निलेश पाटील सर ,
आर्कीटेक निखिल बावस्कार ,
श्रीकांत हाके,अमोल गिते बाळा कांबळे, धीरज चोपडे ,डॉ संगमवार, डॉ पंकज साबळे,
डॉ मयूर वाडे ,डॉ विवेक लहाने,
गणेश बुलखडे, विनय मिरगे
सुधीर उगले, चेतन राठी ,
आदित्य टिबळेवाल ,विशाल कांबळे, अंकुश गर्दळे, संकेत लांजुळकर, शिव शेगोकार ,
प्रकाश गवांदे, योगेश कुवारे ,
प्रवीण शेगोकार ,मंगेश सोलंके,
अक्षय कडाळे ,वैभव ताडेकर ,
निशांत ठाकूर, आकाश बांगर,
अंकुश ठाकूर ,सुरज श्रावगी या सर्व जिम सद्दशाची उपस्थिती होती.

Previous articleकर वसुली कार्यालय सुरू, पण रस्त्याचा प्रश्न कायम; प्रभाग ९ SBI कॉलोनीतील नागरिकांची नाराजी
Next articleजागतिक महिला दिनानिमित्त प्रभाग ९ मध्ये वृक्षारोपणाचा उपक्रम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here