बुलडाणा, (जिमाका) दि. 16 : जिल्हा रूग्णालयात नियमितपणे बुधवारी अस्थीव्यंग संबधित दिव्यांग तपासणी शिबीर घेण्यात येते. मात्र बुधवार, दि. 22 ऑक्टोंबर 2025 रोजी दिवाळी(बलिप्रतिपदा) निमित्त शासकीय सुट्टी असल्यामुळे अस्थिव्यंग संबधित दिव्यांग तपासणी शिबीर रद्द करण्यात आले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील नागरिकांनी तपासणीसाठी येऊ नये, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक यांनी केले आहे.





