Home Breaking News माळेगाव बाजारातील भ्रष्टाचार प्रकरणी तोडगा अद्यापही नाही; प्रहार ता. अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे...

माळेगाव बाजारातील भ्रष्टाचार प्रकरणी तोडगा अद्यापही नाही; प्रहार ता. अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे यांचे अन्नत्याग उपोषण १२व्या दिवशीही सुरूच

34
0

प्रहार ता अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे यांचे विभागीय आयुक्त कार्यालय येथील अन्नत्याग उपोषणाच्या 12 व्या दिवशी ही तोडगा निघाला नसून आखरे उपोषणावर ठामसदरहू माळेगाव बाजार येथील 15 व्या वित्त आयोगामधील भ्रष्टाचाराचा मुद्दा घेऊन ज्ञानेश्वर आखरे हे मागील 16 ऑक्टोंबर पासून अन्न त्याग उपोषण करत आहेत परंतु आज त्यांच्या उपोषणास बारा दिवस पूर्ण झालेले असूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई ही होत नसल्यामुळे संबंधित प्रशासनाप्रती संपुर्ण जनतेच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे ज्ञानेश्वर आखरे यांच्याशी भ्रमणध्वनीद्वारे बोलणे झाले असल्यास त्यांनी सांगितले की दिनांक 24 ऑक्टोंबर रोजी तेल्हारा गट विकास अधिकारी साहेब यांनी सरपंच सचिव यांच्या विरोधात महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 39/1 नुसार पुढील कारवाईचा प्रस्ताव माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला यांच्याकडे सादर केला परंतु त्या प्रस्तावामध्ये व 29 .8.2025,तेल्हारा पंचायत समितीच्या चौकशी समितीकडून प्राप्त झालेल्या चौकशी अहवालामध्ये खूप मोठी तफावत असून कुठेतरी प्रशासन संबंधित भ्रष्टाचारी लोकांना पाठीशी घालण्याचा खूप मोठा मागील सहा महिन्यापासून प्रयत्न करत आहे जोपर्यंत माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद अकोला हे 29 ,8,च्या चौकशी अहवालानुसार व बार्शीटाकळी येथील चौकशी समितीच्या अहवालानुसार हे दोन्ही अहवाल एकत्रित करून पारदर्शक अहवाल हा माननीय विभागीय आयुक्त अमरावती यांचे कडे पुढील कार्यवाही करिता सादर करत नाहीत तो पर्यत उपोषणावरून माघार ही घेणार नाही अशी माहीती ही त्यांनी दिली आहे

Previous articleअमरावती येथिल विभागिय आयूक्त कार्यालय येथे चालू असलेल्या अन्नत्याग उषोणावर प्रहार ता अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे नऊव्या दिवशि ही ठाम
Next articleसंपूर्ण कर्जमुक्तीसाठी शेतकऱ्यांचा लढा तीव्र — नागपूरच्या वेशीवर हजारोंचा जमाव, महामार्ग ठप्प!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here