
शेगाव
येथील भिरडे लॉन मध्ये विकास स्वास्थ योग फाउंडेशन व ज्यूस जर्नी ग्रुप शेगाव यांच्या माध्यमातून प्राकृतिक रंगाचे होळी धुळवळ मंगळवारी साजरी करण्यात आली
यामध्ये सर्वप्रथम श्री संत गजानन महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन डी के शेगोकार यांच्या हस्ते व दीप प्रज्वलन श्याम तेल्हारकर यांच्या हस्ते करण्यात आले
रंगाची पूजा निलेश कलोरे व कवीश्वर आसोलकार यांच्या हस्ते करण्यात आली
सर्व रंग हे नैसर्गिक स्वहस्ते तयार करण्यात आले होते त्यामध्ये मुलतानी माती चंदन निमपत्ते हळद पळस अष्टगंध भस्म व इतर यापासून प्राकृतिक रंग तयार करण्यात आले हे सर्व रंग सर्वश्री मोहन भिरडे, नंदकिशोर भिरडे,नरेंद्र शेंडे, वासुदेव शेंडे,राम शेंडे, मुकुंदराव गणगणे, घनश्याम भिरडे व इतर ज्यूस जर्नीचे सदस्य यांनी मेहनत घेऊन आचार्य विकास पाटील यांच्या मार्गदर्शनात तयार केले
या कार्यक्रमांमध्ये सर्व ज्यूस जर्नीच्या महिला मंडळीचा व पुरुष मंडळाचा सहभाग होता हा कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सर्व सदस्य आनंदराव शेंडे नरेंद्र आसोलकर, प्रमोद भिरडे, किशोर शेगोकार, शंकर शेगोकार, व इतर ज्यूस जर्नीचे सदस्य यांनी अथक परिश्रम घेऊन कार्यक्रम यशस्वी केला शेवटी आभार प्रदर्शन निलेश कलोरे यांनी करून कार्यक्रमाची सांगता गेली








