27 फेब्रुवारी रोजी भव्य निशाण यात्रा व भजन संध्या;
भक्तांना सहभागाचे आवाहन

शेगाव/ प्रतीनीधी
संत नगरी शेगाव शहरात श्री श्याम फाल्गुन उत्सवानिमित्त खाटू श्याम भक्तांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. खाटू श्याम परिवार शेगावच्या वतीने शुक्रवार, 27 फेब्रुवारी रोजी पंधरावा फाल्गुन महोत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा करण्यात येणार असून दिवसभर विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
यामध्ये भव्य निशाण शुक्रवार, 27 फेब्रुवारी रोजी सकाळी 9 वाजता श्री बडा बालाजी मंदिर येथून भव्य निशाण यात्रेला प्रारंभ होणार आहे.शहराच्या मुख्य मार्गांवरून पारंपरिक वाद्यांच्या गजरात,भगव्या पताकांच्या दिमाखात ही यात्रा मार्गक्रमण करणार आहे.
“हारेका सहारा श्याम बाबा हमारा” आणि “खाटू वाले श्याम बाबा की जय” अशा जयघोषांनी वातावरण दुमदुमणार आहे.
बडा बालाजी मंदिरातून निघालेली यात्रा अखेरीस श्याम धाम अग्रसेन भवन येथे विसर्जित होणार आहे.तसेच सायंकाळी
भजन संध्येत निखिल श्याम यांचा सुरेल दरबार सायंकाळी 6 वाजता श्याम धाम, श्री अग्रसेन भवन येथे भव्य भजन संध्या कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.छत्तीसगडमधील राजनांदगाव येथील प्रख्यात खाटू श्याम भजन सम्राट निखिल श्याम आपल्या सुमधुर वाणीने भक्तांना भक्तिरसात तल्लीन करणार आहेत.श्याम नामाच्या गजरात भक्तिमय वातावरणात भजन, कीर्तन आणि आरतीचा सोहळा पार पडणार आहे.
खाटू श्याम परिवार शेगावच्या वतीने या धार्मिक महोत्सवासाठी विशेष सजावट, प्रकाशयोजना, ध्वनीव्यवस्था आणि भक्तांसाठी सोयीसुविधांची उत्कृष्ट व्यवस्था करण्यात आली असुन श्याम
भक्तांना सहभागाचे आवाहन खाटू श्याम परिवाराच्या वतीने सर्व श्याम भक्तांनी निशाण यात्रा व भजन संध्या या दोन्ही धार्मिक सोहळ्यांमध्ये जास्तीत जास्त संख्येने सहभागी व्हावे,असा भावनिक व कळकळीचा आग्रह करण्यात आला आहे.
संत नगरी शेगावमध्ये 27 फेब्रुवारी रोजी साजरा होणारा श्री श्याम फाल्गुन महोत्सव हा भक्ती, श्रद्धा आणि एकात्मतेचा अद्वितीय संगम ठरणार असून शहर पुन्हा एकदा श्याममय होणार आहे.









