Home महाराष्ट्र संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

संत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

5
0

आज संत शिरोमणी संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीनिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी सुरेश कव्हळे यांनी संत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन केले.

कार्यक्रमाला जिल्हा नाझर गजानन मोतेकर तसेच इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. उपस्थितांनी संत सेवालाल महाराजांच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या समाजजागृती, समता आणि बंधुत्वाच्या विचारांचे स्मरण केले.

कार्यक्रमाचा समारोप संत सेवालाल महाराजांच्या विचारांचे आचरण करण्याचा संकल्प करून करण्यात आला.

Previous article
Next articleजिल्हा युवा पुरस्कार: 28 फेब्रुवारीपर्यंत अर्ज आमंत्रीत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here