Home महाराष्ट्र 47 वर्षानंतर शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा च्या माजी विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर स्नेह- मेळावा

47 वर्षानंतर शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा च्या माजी विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर स्नेह- मेळावा

18
0

शेगाव प्रतिनिधी :- स्थानिक “पांडुरंग कृपा” कुणबी समाज भवन शेगाव येथे शासकीय अध्यापक महाविद्यालय बुलढाणा येथील सन 1978- 79 मधील अध्यापकांचा गेट – टूगेदर स्नेह मेळावा दिनांक 20 नोव्हेंबर 2025 रोजी पांडुरंग कृपा कुणबी समाज भवन शेगाव येथे माननीय श्री रमेश पांडुरंग तिव्हाणे सर यांचे अध्यक्ष खाली संपन्न झाला. सदर स्नेह मेळाव्याचे उदघाट्न माननीय श्री दयारामभाऊ वानखडे माजी सभापती पंचायत समिती शेगाव यांनी केले.
तसेच कार्यक्रमास प्रमुख माननीय श्री एल डी पाटील सर बुलढाणा, श्री व्ही.टी. पालवे सर जळगाव खान्देश,श्री सोनोने सर, श्री रावसाहेब फकीरराव तळेकर किनगाव राजा व श्री तेजराव ठोसरे सर साखखेर्डा उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात श्री संत गजानन महाराज व जगतगुरु श्री संत तुकाराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व दिप प्रज्वलनाने झाली. कार्यक्रमाचे अध्यक्ष व उदघाट्क व प्रमुख उपस्थित बांधवांचे शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. स्नेह मेळावा घडवून आणण्यासाठी श्री एल डी पाटील सरांचे व श्री रमेश पांडुरंग तिव्हाणे सरांचे मोलाचे सहकार्य लाभले. मेळाव्यात उपस्थित बांधवांनी स्वतः चा व आपल्या कुटुंबाचा सविस्तर परिचय करून दिला. व आपल्या कुटुंबाची सविस्तर माहिती दिली. सन 1978-79 या वर्षातील आपल्या विशेष आठवणीवर सुद्धा सर्वांनी प्रकाश टाकला.
मेळाव्यासश्री नरेश लक्ष्मण खेर्डे सर सोनाळा, श्री तेजराव जगताप चिखली, श्री आर डी जाधव बुलढाणा,श्री दलसिंग सुरडकर चिखली, श्री प्रभाकर पाटील मलकापूर,श्री प्रकाश देशमुख बुलढाणा,श्री हरिभाऊ गायकवाड कळंबेश्वर, श्री हिरामण जमढाळे देऊळगाव राजा, श्री पांडुरंग टेकाळे, श्री गजानन गायकवाड, श्री ए के खान बुलढाणा, श्री बाबुराव तायडे मलकापूर,श्री बाबाराव देशमुख रिसोड,श्री सुरेश देशकर नागपूर, श्री भीमराव सावळे अकोला, श्री किसनराव वैशाळ कर नागपूर वरील बांधवांची सहपरिवार उपस्थित लाभली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री छगनसिंग मोहता उदयनगर यांनी व आभार प्रदर्शन श्री ए के खान सर यांनी केले कार्यक्रमाचा समारोप माननीय अध्यक्ष श्री रमेश पांडुरंग तिव्हाणे सर यांच्या भाषणाने झाला व नंतर स्नेह भोजनाचा कार्यक्रम संपन्न झाला

Previous articleप्रभाग ९ शेगावमध्ये भाजपची जोरदार हवा; मतदारांचा कल कमळाकडे
Next articleशेगाव श्री हरीभक्त सेवा समिती, शेगांव यांच्या वतीने संगीतमय भागवत कथा ज्ञानयज्ञचे आयोजन करण्यात आले आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here