
नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरात सध्या सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे प्रकाश वानखडे. सामाजिक क्षेत्रात अनेक वर्षे सातत्याने काम करताना त्यांनी वंचित, गरजू आणि सर्वसामान्य नागरिकांच्या प्रश्नांसाठी अखंड लढा दिला आहे. जनतेच्या हक्कासाठी नेहमी आघाडीवर राहणारे प्रकाश वानखडे आज “जनतेचा राजा” म्हणून ओळखले जातात.
अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीत उतरलेल्या वानखडे यांची थेट जनता-जनार्दनाशी जोडलेली नाळ हीच त्यांची खरी ताकद मानली जाते. राजकारणापेक्षा समाजकारण मोठे मानत त्यांनी नेहमीच लोकांच्या अडचणी, प्रश्न आणि मागण्यांना प्राधान्य दिले आहे. स्वच्छता, पाणीपुरवठा, नागरिक सुविधा, महिलांसाठी उपक्रम आणि युवा संघटनांना बळ देण्यात त्यांनी विशेष पुढाकार आहे. तसेच खयवाडीतील बेघर , गरजू गोरगरीब लोकांना घर मिळवून देण्यासाठी शेगाव ते मुंबई पर्यंत प्रयत्न केले व त्यांना न्याय मिळवून दिला आहे.
शहराच्या सर्वांगीण विकासाची स्पष्ट दृष्टी, काम करण्याची तयारी आणि कोणत्याही पक्षाची बेडी नसलेला स्वच्छ चेहरा या गुणांमुळे प्रकाश वानखडे यांच्याबद्दल मतदारांमध्ये उत्साह पाहायला मिळत आहे.
जनतेच्या विश्वासावर आधारित विकास आणि पारदर्शक प्रशासन देण्याचा निर्धार व्यक्त करत प्रकाश वानखडे म्हणतात,
“मी कुणाचं नव्हे, फक्त जनतेचं काम करायला आलो आहे.”
नगरपरिषद निवडणुकीत जनतेच्या पाठिंब्याने मोठे परिवर्तन घडवण्याच्या तयारीत असलेले प्रकाश वानखडे हे सध्या शहरातील चर्चेचा प्रमुख विषय ठरत आहे






