शेगाव प्रतिनिधी – 19 फेब्रुवारी रोजी शिवजयंतीनिमित्त शेगाव शहरातील व्यंकटेश नगर येथील नवदुर्गा उत्सव मंडळाच्या महिलांनी शिवजयंती निमित्त शेगाव मध्ये महिलांची प्रथमच भव्य मोटरसायकल रॅली काढून छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे लेझीम पथकाचे प्रदर्शन केले.
नवदुर्गा उत्सवाच्या अध्यक्षा निकिता अमोल चव्हाण यांच्या नेतृत्वात व्यंकटेश नगर परिसरात वर्षभर विविध सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात. शिवजयंतीचे औचित्य साधत महिलांनी मोटरसायकल रॅलीचे आयोजन करून शिवजयंती उत्साहात साजरी केली.
यावेळी व्यंकटेश नगर येथे शिवरायांच्या प्रतिमेस आमदार व माजी मंत्री डॉ संजय कुटे तसेच अपर्णा संजय कुटे यांनी विधिवत पूजन करून लेझीम पथक व मोटरसायकल रॅलीला हिरवी झेंडी दाखवली.
कार्यक्रमावेळी बोलताना अपर्णा कुटे यांनी व्यंकटेश नगरातील महिलांनी प्रथमच लेझीम पथक तयार करून शिवजयंती निमित्त सादर केलेले प्रदर्शन उल्लेखनीय असल्याचे सांगितले. शिवजयंतीच्या निमित्ताने प्रभागातील महिला व युवतींना एकत्र आणून त्यांना लेझीम व लाठीकाठीचे प्रशिक्षण देण्यात आले. ही आजच्या काळातील गरज असून असे उपक्रम पुढेही सातत्याने सुरू ठेवावेत असे त्यांनी नमूद केले.
यावेळी निकिता अमोल चव्हाण, स्वरा पढाळ, मंजुषा लाड,
प्राची कळसकार, आचल धर्मकार, परिमिता मोरे, तनश्री पाटील, अनन्या ताकोते, तनु बेलोकार,
पूजा गवई, खुशी गवई, आरुषी करे
श्रुती नकोद, पल्लवी बोरेकर,
श्रेया शिसांगे, राणी शिरसागर, इशिका बकाल, आनंदी खेडकर यांचे सह व्यंकटेश नगर प्रभागातील महिलांनी व युवतींनी सहभाग घेतला होता.या शिवजयंतीच्या कार्यक्रमाला मतदार संघाचे आमदार डॉ संजय कुटे व त्यांच्या सुविध्य पत्नी अपर्णा कुटे यांनीसुद्धा उपस्थिती लावत लेझीम हाती घेऊन लेझीम खेळण्याचा आनंद यावेळी घेतलशिवजयंती निमित्त निघालेली व्यंकटेश नगर येथील महिलांची रॅली ही शहरातील प्रथम रॅली ठरल्याची चर्चा दिवसभर सुरू होती. याआधी स्थानिक महिलांनी शिवजयंती निमित्त कधीही मोटरसायकल रॅली काढली नाही व फक्त रॅलीच काढली नाही तर छत्रपती शिवाजी महाराज चौकामध्ये लेझीम प्रदर्शनी सादर केल











