Home महाराष्ट्र आत्ममंथनाचा दिव्य संदेश पसरवत78वा वार्षिक निरंकारी संत समागम संपन्नशेगांवसह बुलढाणा जिल्हा व...

आत्ममंथनाचा दिव्य संदेश पसरवत78वा वार्षिक निरंकारी संत समागम संपन्नशेगांवसह बुलढाणा जिल्हा व महाराष्ट्रातील लाखों भाविक सहभागी

22
0

आत्मसुधार करत जगामध्ये शांतिसुखाचे वातावरण तयार करावे
– निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज

आत्ममंथनाचा दिव्य संदेश पसरवत
78वा वार्षिक निरंकारी संत समागम संपन्न
शेगांवसह बुलढाणा जिल्हा व महाराष्ट्रातील लाखों भाविक सहभागी

आत्मसुधार करत जगामध्ये शांतिसुखाचे वातावरण तयार करावे
– निरंकारी सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज

समालखा, 4 नोव्हेंबर, 2025:- संत निरंकारी मिशनचा 78वा वार्षिक निरंकारी संत समागम सत्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांच्या पावन छत्रछायेखाली 31 आॅक्टोबर ते 3 नोव्हेंबर दरम्यान संत निरंकारी आध्यात्मिक स्थळ, समालखा (हरियाणा) येथे आध्यात्मिकतेच्या मंगलमय वातावरणात संपन्न झाला. 650 एकरांच्या विशाल मैदानावर आयोजित करण्यात आलेल्या या संत समागमामध्ये देश-विदेशातून लाखोंच्या संख्येने भाविक भक्तगणांनी सहभागी होऊन भक्तीमय वातावरणाचा आनंद प्राप्त केला. या संत समागमाचा मुख्य विषय होता

‘आत्ममंथन’.
शेगांवसह बुलढाणा जिल्हा व महाराष्ट्रातून या समागमामध्ये लाखो भाविकांनी भाग घेतला त्यामध्ये हजारोंच्या संख्येने सेवादल बंधुभगिनी आणि अन्य सेवादार भक्तांचाही समावेश होता ज्यांनी समागमाच्या विविध सेवांमध्ये आपले महत्वपूर्ण योगदान दिले.

मानवतेच्या नावे संदेश
समागमाचा शुभारंभ सत्गुरु माताजींनी मानवतेच्या प्रति दिलेल्या दिव्य संदेशाने झाली. त्यामध्ये माताजींनी सांगितले, की मानवाने मानवतेचा मार्ग स्वीकारावा, स्वतःचे अंतरंग सदोदित शुद्ध करत जावे जेणेकरून त्याची व्याप्ती वाढत जाऊन संपूर्ण बाह्य जगात सुधारणा घडेल आणि सगळीकडे शांतीसुखाचे वातावरण स्थापित होईल.सत्गुरु माताजी म्हणाल्या, की आत्ममंथन ही अंतरंगातील एक यात्रा आहे. यास केवळ विचार, मन आणि बुद्धीच्या स्तरावर जाणले जाऊ शकत नाही. यासाठी आपल्या अंतरंगात आध्यात्मिक स्वरूपात चिंतन करण्याची गरज आहे. प्रत्येक मानवाच्या अंतःकरणात आणि बाह्य जगात एक सत्य निवास करते जे स्थिर आणि शाश्वत आहे. हे सत्य प्रथम जाणले पाहिजे. जेव्हा मानवाला प्रत्येकाच्या अंतरंगातील या सत्याचे दर्शन होईल, तेव्हा त्याचा मनात प्रत्येकाविषयी प्रेमभाव उत्पन्न होईल.

भव्य स्वागत
तत्पूर्वी, समागम स्थळी आगमन होताच समागमात उपस्थित समस्त मानव परिवाराच्या वतीने सतगुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमितजी यांचे स्वागत संत निरंकारी मंडळाच्या कार्यकारिणीतील वरिष्ठ सदस्यांकडून पुष्पहार व पुष्पगुच्छ देऊन करण्यात आले. त्यानंतर या दिव्य जोडीला फुलांच्या सजावटीने सुशोभित खुल्या पालखीमध्ये विराजमान करून समागम पंडालच्या मध्यभागातून मुख्य मंचापर्यंत एका भव्य शोभायात्रेच्या रूपात नेण्यात आले. मुख्य मंचाजवळ पोहोचताच, संत निरंकारी इन्स्टिट्यूट ऑफ म्युझिक अँड आर्ट्सच्या 2500 हून अधिक विद्याथ्र्यांकडून भरत नाट्यम नृत्याद्वारे स्वागत गीताचे गायन करण्यात आले. ते दृश्य अत्यंत विलोभनीय होते.

सेवादल रॅली
समागमाच्या दुस-या दिवसाचा शुभारंभ एका भव्य सेवादल रॅलीने झाला. या आकर्षक रॅलीमध्ये संपूर्ण भारतभरातून तसेच परदेशातून आलेल्या सेवादलातील बंधु-भगिनींनी हजारोंच्या संख्येने सहभाग घेतला. या रॅलीत जिथे शारीरिक व्यायाम, खेळ आणि विविध सांस्कृतिक कार्यक्रमांच्या सादरीकरणाद्वारे निःस्वार्थ सेवाभावाची प्रस्तृती करण्यात आली, तिथेच मिशनच्या शिकवणींवर आधारित लघुनाटिका सुद्धा सादर केल्या गेल्या. रॅलीमध्ये सहभागी झालेल्या सेवादल भगिनी-बंधूंना आपले आशीर्वाद प्रदान करताना सतगुरु माताजी म्हणाल्या, की एक भक्त हा चोवीस तास सेवादारच असतो; तथापि, जेव्हा वर्दी परिधान करून सेवा केली जाते, तेव्हा त्याची जबाबदारी अनेक पटींनी वाढते. जेव्हा सेवा या भावनेने समर्पणपूर्वक केली जाते, तेव्हा हे योगदान खरोखरच मानवतेच्या कल्याणासाठी होत राहते.

आत्ममंथन केवळ वैचारिक प्रक्रिया नाही
समागमाच्या दुस-या दिवशी सायंकाळी उपस्थित विशाल मानव परिवाराला आपले आशीर्वाद प्रदान करताना सत्गुरु माताजी म्हणाल्या, की आत्ममंथन ही केवळ साधी विचार करण्याची प्रक्रिया नसून, स्वतःच्या अंतर्मनात डोकावण्याची एक साधना आहे, जी परमात्म्याच्या अनुभूतीमुळे सहज सुलभ होऊ शकते. आत्ममंथन म्हणजे स्वतःच्या सुधारणेचा मार्ग आहे. जेव्हा मन निरंकाराशी जोडले जाते, तेव्हा आंतरिक शांती आणि बाह्यवर्तन दोन्ही दिव्यतेने उजळून निघतात.

मध्यम मार्गाचा अंगीकार करुन संतुलित जीवन जगावे
समागमाच्या तिस-या दिवशी उपस्थित लाखोंच्या विशाल मानव परिवाराला संबोधित करताना सत्गुरु माताजी म्हणाल्या, की केवळ भौतिक संसारामध्ये रमणे किंवा आध्यात्मिक उन्नतीच्या नावाखाली संसाराचा त्याग करणे या दोन्ही बाबी अत्यंत टोकाच्या आहेत. संतांनी सदोदित मध्यम मार्गाचा उपदेश केला आहे. संसारात राहून जबाबदा-यांचे पालन करत असतानाच परमार्थ साधून संतुलीत जीवन जगण्याचा संदेश संतांनी दिला आहे. जेव्हा आपण परमात्म्याच्या उपस्थितीची जाणीव ठेवून प्रत्येक कार्य निर्लेप भावनेने करतो तेव्हा ती एक प्रकारची सेवाच होते आणि त्यायोगे जीवनाच्या दोन्ही पैलुंची पुर्ती होते.

निरंकारी राजपिताजी यांचे संबोधन
समागमाच्या दुस-या दिवशी आदरणीय निरंकारी राजपिता रमितजींनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले, की परमात्म्याबद्दल अनेक भिन्न भिन्न दृष्टिकोन पाहायला व ऐकायला मिळतात. वास्तविक परमात्मा हे एक असे सार्वभौमिक सत्यसत्य आहे जे सदैवकाळ सत्य राहते. वेद, ग्रंथ, शास्त्रे याचेच प्रमाण देतात. हे सत्य जाणण्याचा अधिकार प्रत्येक मानवाला आहे आणि या परम सत्याचा बोध करून देण्यासाठीच सतगुरु पृथ्वीवर अवतरित होतात. म्हणूनच प्रत्येक मानवाने सतगुरुंच्या कृपेने वेळ असतानाच हे सत्य प्राप्त करावे.
समागमाच्या तिस-या दिवशी आदरणीय राजपिताजी यांनी प्रतिपादन केले, की एखादा सज्जन सांसारिक प्रेमामध्ये पडला तरी तो आपल्या प्रियकराला ईश्वराचा दर्जा देतो आणि आनंदात राहतो. तर मग ज्याने सत्गुरुच्या प्रति हृदयामध्ये दिव्य प्रेम उत्पन्न केले तर असा प्रेमी भक्त आनंदाने नाचू लागणे अगदी स्वाभाविक आहे. त्यानंतर त्याला अवघे विश्वच ईश्वराचे रूप दिसू लागते. तात्पर्य, प्रेम ही एक अद्भुत शक्ती आहे आणि या जगामध्ये जर प्राप्त करण्यायोग्य काही असेल तर हेच अटळ सत्य आहे, हे दिव्य प्रेमच आहे.

समागमात हरियाणाचे माननीय राज्यपाल आणि माननीय मुख्यमंत्री यांचे आगमन
समागमाच्या दुस-या दिवशी हरियाणाचे माननीय राज्यपाल प्रोफेसर असीम कुमार घोष यांनी आपल्या धर्मपत्नीसह समागमामध्ये येऊन सतगुरु माताजी व निरंकारी राजपिताजी यांचे आशीर्वाद प्राप्त केले व त्यांच्या प्रति आपला आदरभाव व्यक्त केला. आपल्या संबोधनामध्ये त्यांनी संत निरंकारी मिशनच्या दिव्य विचारधारेची व मानवतेच्या प्रति केल्या जाणाÚया निष्काम सेवांची स्तुती केली. निरंकारी सेवादलाच्या मर्यादा व अनुशासनाचीही त्यांनी प्रशंसा केली. समागमाच्या तिस-या दिवशी हरियाणाचे माननीय मुख्यमत्री श्री.नायब सिंह सैनी यांनी समागमामध्ये येऊन सत्गुरुंचे आशीर्वाद प्राप्त केले. या प्रसंगी आपल्या भावना प्रकट करताना ते म्हणाले, की निरंकारी मिशन आत्ममंथन, आत्मसुधार व समाज निर्मितीचे प्रेरणास्रोत आहे. इथे समस्त भेदभावांच्या पलीकडे जाऊन मानवाला मानव बनण्याची शिकवण दिली जाते. आध्यात्मिक जागृती बरोबरच मिशन समाज कल्याणाच्या कार्यांमध्ये अनुकरणीय योगदान देत असून ही बाब अत्यंत प्रशंसनीय आहे असे ते म्हणाले.

समापन स़त्र
या वर्षीचा संत समागम हा चार दिवसांचा होता ज्याचे समापन सोमवारी रात्री सत्गुरु माता सुदीक्षाजी महाराज यांच्या दिव्य प्रवचनाने झाले, ज्यामध्ये सत्गुरु माताजींनी सांगितले, की ईश्वराने हे जग अत्यंत सुंदर बनविले आहे आणि मानवाने त्याचा आनंद अवश्य घ्यायचा आहे. तथापि, आपल्या विवेक बुद्धीचा वापर करुन प्रभुनिर्मित सृष्टीतील समस्त वस्तूंचा सदुपयोग करावा, दुरुपयोग करु नये. शेवटी, सत्गुरु माताजींनी निरंकारी भक्तगणांना आवाहन केले, की चार दिवसाच्या या संत समागमामध्ये जे आत्ममंथन झाले आहे, जी दिव्य शिकवण प्राप्त झाली आहे ती रात्रंदिवस, जीवनभर आपल्या जीवनात उतरवून स्वतःचे कल्याण साधण्याबरोबरच इतरांचेही कल्याण करत जावे. तत्पूर्वी, समागम समितीचे समन्वयक तथा संत निरंकारी मंडळाचे सचिव आदरणीय जोगिंदर सुखीजाजी यांनी सत्गुरु माताजी, निरंकारी राजपिताजी तसेच समस्त साध संगत आणि समागमासाठी सहकार्य करणा-या सरकारी यंत्रणांचे हार्दिक आभार प्रकट केले.

कवि दरबार
या संत समागमामध्ये प्रत्येक दिवशी कवि दरबार कार्यक्रम आयोजित करण्यात आला ज्यामध्ये विद्वान बालक, महिला व पुरुष मिळून एकंदर 38 कवींनी हिंदी, पंजाबी, इंग्रजी, हरियाणवी, मुलतानी, उर्दु आणि मराठी भाषांमधून ‘आत्ममंथन’ या विषयावर आपापल्या कविता सादर केल्या ज्याची श्रोत्यांनी खूप प्रशंसा केली.

निरंकारी प्रदर्शनी
संत समागमामध्ये आधुनिक तंत्रज्ञान व विद्युत रोषणाईचा वापर करुन अत्यंत सुंदर प्रदर्शनी तयार करण्यात आली होती, जी भाविक-भक्तगणांच्या आकर्षणाचे केंद्र बनून राहिली. भाविकांच्या सुविधेसाठी ही प्रदर्शनी मुख्य प्रदर्शनी, बाल प्रदर्शनी वं संत निरंकारी चैरिटेबल फाउंडेशनची प्रदर्शनी अशा तीन भागांमध्ये विभाजित करण्यात आली होती. समागम सुरु होण्याआधीपासून ही प्रदर्शनी समागम संपेपर्यंत भाविकांसाठी रात्रंदिवस खुली होती जिचा लाभ लाखो भाविकांनी प्राप्त केला.

Previous articleसोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाचा वरवधु परिचय मेळावा शेगांव …
Next articleजिल्हाधिकारी कार्यालयात ‘वंदे मातरम्’ राष्ट्रीय गीताचे सामुहिक गायन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here