
१२ एप्रिल रोजी शेगाव येथे Success Path Education Pvt. Ltd.या संस्थेमार्फत राष्ट्रीय स्तरावरील अबॅकस स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते. सक्सेस पाथ अजुकेशन प्राइवेट लिमीटेडचे संचालक श्री. रणजीत रावसाहेब देशमुख व सौ. दर्शना रणजीत देशमुख यांनी या स्पर्धेचे उत्कृष्ट नियोजन केले होते.
या स्पर्धेला संपूर्ण महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधून विद्यार्थी तसेच अबॅकस शिक्षकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. एस. एस. म्हस्के (HOD, E&TC विभाग, माऊली कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग) तसेच प्रा. प्रतीक देशमुख (HOD, सिद्धिविनायक टेक्निकल कॅम्पस, शेगाव) उपस्थित होते. त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रेरणा दिली.
स्पर्धेमध्ये विविध पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. “बेस्ट इन्स्टिट्यूट अवॉर्ड” हा मान आविष्कार अबॅकस अकॅडमी, अंत्री देशमुख तसेच इंग्लिश गुरु अकॅडमी, वडेगाव यांनी पटकावला. “बेस्ट फ्रँचायझी अवॉर्ड” वैषाली अरू (रिठाड) व शीतल पाटील (भुसावळ) यांना प्रदान करण्यात आला. “ऍक्टिव्ह सेंटर अवॉर्ड” राहुल राऊत (मेहकर) आणि तेजस्विनी चव्हाण देशमुख (शेगाव) यांना मिळाला.
स्पर्धेमध्ये १०० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना “चॅम्पियन ऑफ चॅम्पियन्स” हा विशेष पुरस्कार देण्यात आला. तसेच सर्व विजेत्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्रमांकानुसार पारितोषिके देण्यात आली. विशेष म्हणजे, अत्यंत कमी वेळेत १०० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना सायकल हे आकर्षक बक्षीस देण्यात आले. यावेळी तीन विद्यार्थ्यांना सायकली देण्यात आल्या
ही स्पर्धा विद्यार्थ्यांच्या गणिती कौशल्यांचा विकास करण्यासाठी अत्यंत उपयुक्त ठरली असून, भविष्यात विद्यार्थ्यांना याचा फायदा होणार आहे, त्यामुळे पालकांनी ही ह्या अभ्यासक्रमाला प्राधान्य देऊन विद्यार्थ्यांना या अभ्यासक्रमात सहभागी करायला हवे असे मत यावेळी दर्शना देशमुख मॅडम यांनी व्यक्त केले बघूया सविस्तर








