Home महाराष्ट्र जय गजानन ज्युनिअर कॉलेज, जलंब ता. शेगावच्या कु. दिशा रावणचवरे हिचा राज्यस्तरीय...

जय गजानन ज्युनिअर कॉलेज, जलंब ता. शेगावच्या कु. दिशा रावणचवरे हिचा राज्यस्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी ऐतिहासिक निवड!

24
0

प्रतिनिधी -शेगांव/बुलढाणा

:- क्रीडा व युवक सेवा संचालनालय, महाराष्ट्र राज्य, पुणे अंतर्गत उपसंचालक, क्रीडा व युवक सेवा, अमरावती विभाग, अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ व अमरावती जिल्हा हौसी जिमनॅस्टिक संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या अमरावती विभागीय जिमनॅस्टिक क्रीडा स्पर्धा ही नुकतीच अत्यंत उत्साहात पार पडली.

या स्पर्धेत 19 वर्षांखालील वयोगटामध्ये जय गजानन ज्युनिअर कॉलेज, जलंब (ता. शेगाव) येथील विद्यार्थिनी कु. दिशा रविंद्र रावणचवरे हिने रिदमिक जिमनॅस्टिक प्रकारात उत्कृष्ट कामगिरी करत आपले कौशल्य सिद्ध केले. तिच्या मेहनतीला आणि जिद्दीला यथोचित न्याय देत तिने विभागात घवघवीत यश संपादन करत राज्यस्तरीय जिमनॅस्टिक स्पर्धेसाठी (नागपूर येथे होणाऱ्या) निवड मिळवली आहे. ही केवळ तिच्यासाठीच नव्हे, तर संपूर्ण महाविद्यालयासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब आहे.

कु. दिशाच्या या यशामागे तिच्या कठोर परिश्रमांबरोबरच तिच्या पालकांचे व प्रशिक्षकांचे मोलाचे योगदान आहे. तिच्या यशाबद्दल संस्थेचे अध्यक्ष मा. श्री. शत्रुघ्न बिरकड साहेब, प्राचार्या सौ. कल्पना सुरळकर मॅडम, तसेच प्रशिक्षक व उत्कृष्ट मार्गदर्शक श्री. राहुल पहुरकर सर यांनी तिचे विशेष कौतुक करत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

तिचे पालक – आई प्रा. सुनंदा रावणचवरे व वडील प्रा. रविंद्र रावणचवरे यांनी देखील तिच्या यशाबद्दल आनंद व्यक्त करत तिला सतत सकारात्मक ऊर्जा व प्रेरणा दिली. महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक वर्ग, शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थीवर्ग यांनीही तिचे मन:पूर्वक अभिनंदन केले आहे.

जय गजानन ज्युनिअर कॉलेज कु. दिशाच्या उज्वल भविष्यासाठी सदैव तिच्या पाठीशी असून, तिच्या यशाचे प्रेरणादायी रूपात कौतुक करत आहे. तिने येणाऱ्या राज्यस्तरीय स्पर्धेत देखील आपली चमकदार कामगिरी कायम ठेवून महाविद्यालयाचे व जिल्ह्याचे नाव उज्वल करावे, हीच अपेक्षा!

Previous article78 व्या वार्षिक निरंकारी संत समागमाची व्यापक पूर्वतयारी शेगांव जिल्हा बुलडाण्यासाह महाराष्ट्रातील हजारो स्वयंसेवक समर्पित करत आहेत त्यांच्या निष्काम सेवा
Next articleराज्यातील आगामी नगरपरिषद निवडणुकीत 68 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here