अखेर प्रहार जनशक्ती पक्ष तेल्हारा ता अध्यक्ष ज्ञानेश्वर आखरे यांच्या गेल्या दोन वर्षापासून चालू असलेल्या भ्रष्टाचाराविरूद्धच्या लढ्याला यश
ग्राम पंचायत माळेगांव बाजार येथील सरपंच सौ सिमा संजय अढाऊ ह्या अप्पर आयूक्त सुरज वाघमारे अमरावी यांनी दि 6..2.2026 रोजी दिलेल्या आदेशानुसार अपाञ घोषीत करण्यात आले
ग्राम पंचायत माळेगांव बाजार येथील 14 वित्त आयोग मधिल निधी हा आराखड्या बाहेरील कामावर शासन नियमानुसार खरेदी प्रक्रिया राबवलेली नसल्यामुळे कर्तव्यात कसूर व पदाचा दुर्उपयोग केल्याचे चौकशी अंती निषपन्न झाल्यामुळे सरपंच सौ सिमा संजय अढाऊ यांना दि 6.2.2026 रोजी सदस्य पदावरून व सरपंच पदावरुन अपाञ घोषीत केले आहे
सदरहू माळेगांव बाजार येथील ग्राम पंचायत ही तेल्हारा तालूक्यातील मोठी पंचायत असून खुप प्रतिष्ठेची माणल्या जाते या निर्णयाने जिल्हातील राजकिय वर्तूळात व अधिकारी वर्गात खळबळ उडाली आहे
ज्ञानेश्वर आखरे यांच्याशी फोनद्वारे बोलणे झाले असून त्यांनी म्हटले विद्यमान आयुक्त यांनी दिलेल्या निर्णयाचे मी स्वागत करतो
गावातील जनतेच्या कल्यानाकरीता आलेल्या निधिचा खुप मोठ्या प्राणांत दुरपयोग व अनियमितता व भ्रष्टाचार झालेला असून हा निकाल फक्त 14 वा वित्त आयोगामधिल निधीबाबदचाच आहे यापेक्षाही खुप मोठ्या प्राणांत 15 वा वित्त आयोगामधिल अंदाजे 50 लक्ष रू च्या वर भ्रष्टाचार झालेला असून त्या बाबदची सुद्धा न्यायालयामध्ये केस चालू आहे जो पर्यत झालेल्या भ्रष्टाचाराचा ऐकन ऐक रूपया वसूल होत नाही तो पर्यत माझा भ्रष्टाचारा विरूद्ध चा लढा हा सुरूच राहील
अर्जदार यांच्या कडून अॅडवोकेट श्री जितेंद्र काकडे साहेब यांनी काम पाहीले










