Home महाराष्ट्र बुलढाण्यात १४ ऑगस्टला जिल्हा गुंतवणूक परिषद; उद्योग व रोजगाराच्या नव्या संधींना चालना

बुलढाण्यात १४ ऑगस्टला जिल्हा गुंतवणूक परिषद; उद्योग व रोजगाराच्या नव्या संधींना चालना

24
0

बुलढाण्यात १४ ऑगस्टला जिल्हा गुंतवणूक परिषद; उद्योग व रोजगाराच्या नव्या संधींना चालना

बुलढाणा, दि. १२ (जिमाका) : जिल्ह्यातील औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी, स्थानिक तरुणांना रोजगाराच्या नवीन संधी उपलब्ध करून देण्यासाठी तसेच जिल्ह्यातील नाविन्यपूर्ण उद्योग व गुंतवणुकीची दारे खुली करण्याच्या उद्देशाने ‘बुलढाणा जिल्हा गुंतवणूक परिषद २०२६’ (District Investment Summit 2026) आयोजित करण्यात आली आहे. ही परिषद १४ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी १० वाजता बुलढाणा अर्बन रेसिडेन्सी क्लब, मलकापूर रोड, बुलढाणा येथे होणार आहे.

जिल्ह्यातील गुंतवणूकदार आणि व्यवसायांना एक व्यासपीठ उपलब्ध करून देणे, जिल्ह्याची अर्थव्यवस्था बळकट करणे, गुंतवणूक आकर्षित करणे आणि रोजगाराच्या संधी निर्माण करणे हा या परिषदेचा प्रमुख उद्देश आहे.

परिषदेत कृषी प्रक्रिया उद्योग, पर्यटन, ऑटोमोबाईल घटक तसेच सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSMEs) क्षेत्रातील गुंतवणुकीसाठी उपलब्ध असलेल्या संधींबाबत माहिती देण्यात येणार आहे. तसेच उद्योग उभारणीसाठी आवश्यक असणारे परवाने, शासनाच्या विविध योजना आणि उपलब्ध सवलतींची माहिती उद्योजकांना एकाच छताखाली उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

जिल्ह्यात गुंतवणूक वाढविण्यासाठी विविध नामांकित उद्योगसमूहांसोबत कोट्यवधी रुपयांच्या गुंतवणुकीचे सामंजस्य करार (MoUs) करण्याचे नियोजन आहे. या माध्यमातून जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्राला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा आहे. या परिषदेसाठी जिल्ह्यातील नवउद्योजक, शेतकरी उत्पादक संस्था, वित्तीय संस्था, उद्योग विभागाशी संबंधित यंत्रणा यांना जिल्हा उद्योग केंद्र, बुलढाणा यांच्यावतीने आमंत्रित करण्यात आले आहे.

परिषदेचे उद्घाटन मदत व पुनर्वसन मंत्री तथा, जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद जाधव (पाटील) यांच्या हस्ते होणार आहे. स्थानिक उद्योग, गुंतवणूक आणि रोजगार निर्मितीला चालना देण्यासाठी ही परिषद महत्त्वपूर्ण ठरणार आहे. बुलढाणा जिल्ह्यात उद्योगांसाठी उपलब्ध असलेल्या संधींचा लाभ घेऊन अधिकाधिक उद्योजकांनी परिषदेला उपस्थित राहावे, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्र सहायक आयुक्त यांनी केले आहे.

Previous articleवरवट बकाल येथे १४ ऑगस्टला पंडित दीनदयाळ उपाध्याय प्लेसमेंट ड्राइव्ह
Next articleसुरुवातीच्या अवस्थेतच कपाशीवरील रसशोषक कीड व गुलाबी बोंडअळीचे व्यवस्थापन करा; कृषी विभागाचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here