[ शेगाव येथील माळी समाज राज्यस्तरीय युवक-युवती परिचय संमेलनात समाज बांधवांची दुसऱ्या दिवशी मांदियाळी ]
[ दिवसभरात कामगार मंत्रीसह विविध मान्यवरांनी दिल्या भेटी ]

शेगांव:- माळी समाजाचे ३२ व्या राज्यस्तरीय युवक युवती परिचय महासम्मेलनाला संत नगरी शेगावं येथे शनिवार दि.१० जानेवारी २०२६ रोजी सुरुवात झाली असून परिचयाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवार दि ११ जानेवारी रोजी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी सौं.कमलताई लक्ष्मनराव तायडे ह्या होत्या तर यावेळी सौं. स्वातीताई वाकेकर, माजी आमदार लक्ष्मणराव तायडे, माजी आमदार कृष्णरावजी इंगळे, माजी आमदार बळीरामजी सिरस्कार, सौ अनिता ताई सातव , मीनाताई वैराले ज्योती सातव यांच्यासह आयोजन समिती अध्यक्ष प्रदीप सातव कार्याध्यक्ष गणेशराव वैराळे, डॉ.शंकरराव क्षीरसागर, डी.एस.खंडारे,डॉ. भास्कर चरखे, श्रीकृष्णजी बोळे, सुरेशभाऊ गिऱ्हे, संजय वानखडे, प्राचार्य दिनेश तायडे, गजाननराव राऊत, रघुनाथजी चोपडे, महादेव खंडारे आत्माराम जाधव, बंडूभाऊ इंगळे, विजय वावगे, नामदेव बहादरे, योगेश हजारे, अँड.श्रीकांत तायडे, यांच्या प्रमुख उपस्थितीत माळी समाज राज्यस्तरीय युवक-युवती परिचय महासंमेलनाच्या दुसऱ्या दिवशीची सुरुवात झाली असून या दुसऱ्या दिवशी समाज बांधवांची दुसऱ्या दिवशी मांदियाळी पहायला मिळाली. दरम्यान कामगार मंत्री आकाशदादा फुंडकर यांनी युवक-युवतींना आपला जीवनसाथी निवडण्यासाठी परिचय महासंमेलन हे एक हक्काचे व्यासपीठ असल्याचे मत व्यक्त करत माळी समाजाच्या परिचय मेळाव्यातील उत्कृष्ट नियोजनाची यांच्याकडून मुक्तकंठाने प्रशंसा देखील केली. दरम्यान कामगार मंत्रीसह दिवसभरात आचार्य हरिभाऊजी वेरुळकर, ज्ञानेश्वर दादा पाटील, शेगाव नगर परिषदचे नगराध्यक्ष प्रकाशजी शेगोकार, यासह विविध मान्यवरांनी भेटी दिल्या. तसेच कार्यक्रमात विशेष सहकार्य करणाऱ्या मान्यवरांचा, कार्य कर्त्यांचा सत्कार देखील करण्यात आला.
सदर या युवक-युवती परिचय महासंमेलनात अकोला विभागाचे उपाध्यक्ष प्रा. नितीन देऊळकर, आत्माराम जाधव, अँड. शंकरराव गिऱ्हे, सचिव दिपक रौंदळे, गोपाल तायडे, गजानन निमकर्डे, नितीन इंगळे, सुधीर उगले, डॉ. चंद्रकांत बोळे, राजेश तायडे, विनोद इंगळे यासह खामगाव विभागाचे अजय तायडे, विकास बगाडे, श्रीकृष्ण खंडारे, विजय वावगे, पंकज सातव, विनायक जुमळे , रघुनाथ चोपडे, उल्हास वानखेडे, विजय राखोंडे, कैलास जामगडे, एकनाथ इंगळे, मनोज वानखेडे, सुनिल सातव यांच्यासह माळी समाज बहुउद्देशीय मंडळ, युग पुरुष महात्मा फुले प्रतिष्ठान अकोला व माळी सेवा मंडळ खामगांव येथील पदाधिकारी व समाज बांधव मोठया संख्येने उपस्थितीत होते. कार्यक्रमाचे संचालन अनिल गिऱ्हे , प्रास्ताविक अजय तायडे आभार प्रदर्शन विजय राखोंडे यांनी मानले.








