Home महाराष्ट्र सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाचा वरवधु परिचय मेळावा शेगांव …

सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजाचा वरवधु परिचय मेळावा शेगांव …

39
0
सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज मध्यस्थी मंडळ ट्रस्ट व विदर्भ प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने संत नगरी शेगावात वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन

शेगांव दि7नोव्हेंबर

सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज मध्यस्थी मंडळ ट्रस्ट व विदर्भ प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमाने संत नगरी शेगावात वधु वर परिचय मेळाव्याचे आयोजन
८ व ९ नोव्हेंबरला दोन दिवसीय मेळाव्याला लाभणार मान्यवरांची उपस्थिती शेगाव :- सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज मध्यस्थी मंडळ ट्रस्ट व विदर्भ प्रदेश यांच्या संयुक्त विद्यमानाने गाडीलोहार, जिनगर समाजाचा अखिल भारतीय स्तरावरील वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे विदर्भाची पंढरी श्री संत गजानन महाराज यांच्या पावन भूमी शेगाव येथील श्री गणेशप्रस्त मंगल कार्यालय येथे ८ आणि ९ नोव्हेंबर २०२५ रोजी आयोजन करण्यात आले आहे.
सदर वधू-वर पालक परिचय मेळाव्याचे कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा. प्रतापराव जाधव केंद्रीय राज्यमंत्री आयुष मंत्रालय, आरोग्य व कुटुंब कल्याण हे राहणार असून कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राज्याचे कामगार मंत्री मा. ना. अँड. आकाशदादा फुंडकर यांची उपस्थिती राहणार आहे. तसेच या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून खा. अनुप धोत्रे, आ. डॉ. संजय कुटे, आ. संजय गायकवाड, मोहनराव नरसिंगजी पिंपळे अध्यक्ष सोमवंशी आर्य क्षत्रिय प्रादेशिक मंडळ ट्रस्ट महाराष्ट्र राज्य, प्रमोद बागलाने मा. अध्यक्ष अ.भा.सो.आ.क्ष. समाज, मोहनराव आहेर अध्यक्ष सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज ट्रस्ट पुणे, आ. मनोज कायंदे, मा. आ. राजेंद्र शिंगणे आदींची उपस्थिती लाभणार आहे. सदर मेळाव्यामध्ये सोमवंशी आर्य क्षत्रिय समाजातील विदर्भासह संपूर्ण महाराष्ट्र राज्यातील समाज बांधव तसेच आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा मध्य प्रदेश आदी भागातून सुद्धा मोठ्या संख्येने समाज बांधव मेळाव्याला उपस्थित राहणार आहेत. सदर मेळाव्यामध्ये येणाऱ्या समाज बांधवांसाठी आयोजकांकडून मेळाव्यास्थळी भोजनाची व्यवस्था करण्यात आलेली आहे. आतापर्यंत या मेळाव्या करिता शेकडो वधू-वरांनी नोंदणी केली असून मेळाव्यास्थळी सुद्धा वधु वर परिचय मेळाव्याची नोंदणी सुद्धा सुरू राहणार आहे.
पसंती झाल्यास लगचेचच लग्न
या मेळाव्यात उपवर वधुंनची पसंती झाल्यास व दोन्हि कडिल मंडळी राजी असल्यास लगेचच दुसऱ्या दिवशी म्हणजेच 9नोव्हेंबर रोजी मध्यस्त मंडळ स्वखर्चाने लग्न करुन देईल अशी माहिती यावेळी आयोजकांनी दिली
तरी या अखिल भारतीय स्तरावरील मेळाव्याला जास्तीत जास्त समाजातील वधू-वरांनी उपस्थित राहून आपला योग्य तो जीवनसाथी निवडावा असे आवाहन सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज मध्यस्थी मंडळ ट्रस्ट व विदर्भ प्रदेश यांच्या वतीने अध्यक्ष गणेश किसनराव आहेर, उपाध्यक्ष रविंद्र धोंडिबा नवगिरे, सचिव अॅड. अनिल दत्तात्रय अंबुसकर, सहसचिव विजय वसंतराव तायवाडे, खजिनदार अमर विठ्ठलराव सोनवळकर, सहखजिनदार प्रदीप अर्जुन केणेकर, कार्याध्यक्ष विनोद गुलाबराव बिंड, सहकार्याध्यक्ष सुनिल शांताराम दिवेकर, कार्यकारी सदस्य संजय रामचंद्र आंबले सुनील जनार्धन नागवंशी, दिलीप बाबुराव भगत, बाळासाहेब गोविंद होनकळसे, नागेश चंद्रकांत वाघमारे, डिगंबर शंकरराव मानेकर, योगेश दिगंबर होनकळस, हेमंत शांताराम कांबळे, प्रविण मधुकर भालेराव, योगेश राजेंद्र इंगळे (सी.ए.), महिला प्रतिनिधी सौ. वंदनाताई अनंत नागवंशी, सौ. प्रांजल गोपाळ भागवत, सौ. उज्वलाताई बाळासाहेब डेंगळे, सल्लागार प्रमुख प्रो. नानासाहेब वि. भडके, अकोला, यशवंत कन्हेरे, पुणे राजीवज काकडे, छ. संभाजीनगर सुनिल चंद्रकांत भालेराव, बुलढाणा राजीव वसंतराव यंदे, परभणी, रविंद्र अशोक जाधव, पुणे, एस. एस. पवार, छ. संभाजीनगर, विजय मानेकर यवतमाळ, अनुप गवळी सोमवंशी आर्य क्षत्रिय समाज युवा अध्यक्ष खामगाव, निलेश मानेकर, अध्यक्ष सो आ क्ष. स. स, अमरावती यांनी केले आहे

Previous articleजिल्हाधिकाऱ्यांची राजकीय पक्षांच्या पदाधिकाऱ्यांसोबत बैठक
Next articleआत्ममंथनाचा दिव्य संदेश पसरवत78वा वार्षिक निरंकारी संत समागम संपन्नशेगांवसह बुलढाणा जिल्हा व महाराष्ट्रातील लाखों भाविक सहभागी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here