
शेगांव(प्रतिनिधी):- सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या आदेशानव्ये छ. संभाजीनगर झोन अंतर्गत शाखा शेगावमध्ये संत निरंकारी चॅरीटेबल फाउंडेशनच्या वतीने रविवार दि. १२ ऑक्टोबर रोजी संत निरंकारी सत्संग भवन शेगांव या ठिकाणी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला असून ७५ भाविकांनी रक्तदान केले आहे.
शिबिराचा शुभारंभ मा. श्री. ज्ञानेश्वर दादा पाटील पक्षनेते (खामगाव विधानसभा) तसेच माऊली ग्रुप ऑफ इन्स्टिट्युशन चे चेअरमन व जिल्हा संयोजक संतोषजी शेगोकर यांच्या करकमलांनी करण्यात आले. संतोषजी शेगोकार यांनी आपले मनोगत व्यक्त करताना बोलेले की संत निरंकारी मिशन आध्यात्मिक विचारधारेबरोबर सामाजिक कार्यामध्ये सुद्धा अग्रेसर आहे जसे शेगांव येथे रक्तदानमहोत्सव होत आहे तसेच मानवतेच्या कल्याणार्थ वेळोवेळी संपूर्ण विश्वामध्ये – स्वच्छता अभियान, वृक्षारोपण, निशुल्क आरोग्य तपासणी, महापुरांमध्ये पूरग्रस्तांना मदत, करोना ग्रस्तांना मदत तसेच अनेक नैसर्गिक संकटाच्या वेळी मिशनद्वारे असे अनेक प्रकारे मानवसेवेचे उपक्रम राबविण्यात येतात. सन 1986 पासून रक्तदान शिबिराचे आयोजन अव्याहतपणे सुरू आहे. यामध्ये संपूर्ण भारतवर्षात 14.5 लक्ष रक्तदान मानवतेच्या कल्याणार्थ करण्यात आले आहे .रक्तदान महोत्सवाच्या जनजागृती करीता शेगांव शहरामध्ये सकाळी पायदळ रॅली काढण्यात आली. या रॅलीमध्ये सेवादल वर्दीमध्ये महिला-पुरुषांसोबत लहान- थोरांपासून बुजरुकांनी सुद्धा उत्स्फूर्त सहभाग घेतला होता, आणि ठिकठिकाणी नागरिकांना रक्तदानाचे महत्त्व पोम्प्लेट व निरंकारी पत्रिका देऊन पटवून देण्यात आले. आपण मानव आहोत रक्तदान करणे हे आपले मानवीय कर्तव्य आहे. रक्तदानाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आपण दुसऱ्या व्यक्तीशी रक्ताचे नाते जोडू शकतो असा सुदंर संदेश देण्यात येत आहे.
रक्त संकलन सईबाई मोटे शासकीय रूग्णालय शेगांव व अकोला जिल्हा लेडी हारडींग शासकीय रूग्णालय ब्लड बँक यांच्या माध्यमातून उत्तम प्रकारे करण्यात आले.
सदर शिबिरासाठी बुलडाणा जिल्हा संयोजक, ज्ञान प्रचारक तथा शेगांव ब्रँच मुखी संतोषजी शेगोकार यांच्या मार्गदर्शनामध्ये सेवादल युनिट नं 1309 चे संचालक महात्मा तथा बहेनजी सोबतच युवकांचे व अन्य स्थानिक भाविक भक्तांचे मोलाचे सहकार्य लाभले. शेगांव तसेच आजुबाजूच्या परिसरातील युवकांनी भरभरून रक्तदान करून मानवतेच्या या महान यज्ञरूपी कार्यामध्ये आपले अतुलनीय योगदान दर्शविले.








