Home महाराष्ट्र आज दिनांक 16/09/2026 रोजी रेल्वे पोलीस ठाणे शेगाव यांच्या वतीने हिसार एक्सप्रेस...

आज दिनांक 16/09/2026 रोजी रेल्वे पोलीस ठाणे शेगाव यांच्या वतीने हिसार एक्सप्रेस रेल्वे गाडीच्या समोरील जनरल कोचमध्ये धावत्या रेल्वेत रेल्वे डॉमिनेशन मोहीम राबविण्यात …

14
0

सदर डॉमिनेशनदरम्यान समोरील जनरल कोचमधील प्रवाशांशी संवाद साधून त्यांच्या सुरक्षिततेबाबत पाहणी करण्यात आली. तसेच प्रवाशांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जनजागृती मोहीम राबविण्यात आली.

यावेळी प्रवाशांना ऑनलाईन फसवणूक, बनावट फोन कॉल, OTP मागून केली जाणारी फसवणूक, KYC अपडेटच्या नावाखाली होणारी फसवणूक, बनावट लिंक/वेबसाईट, QR कोडद्वारे होणारी आर्थिक फसवणूक, बनावट कस्टमर केअर क्रमांक तसेच सोशल मीडिया व विविध ऑनलाइन माध्यमांद्वारे होणाऱ्या सायबर गुन्ह्यांपासून सावध राहण्याबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

प्रवाशांना कोणत्याही अनोळखी व्यक्तीस OTP, ATM/डेबिट कार्ड माहिती, CVV, PIN, UPI PIN, पासवर्ड किंवा बँक खात्याची गोपनीय माहिती देऊ नये, तसेच संशयास्पद लिंकवर क्लिक करू नये व अनोळखी व्यक्तीने सांगितलेल्या ॲप्लिकेशनद्वारे मोबाईलचा ताबा देऊ नये, याबाबत सूचना देण्यात आल्या.

तसेच सायबर फसवणुकीस बळी पडल्यास तात्काळ 1930 या राष्ट्रीय सायबर हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदविण्याबाबत प्रवाशांना माहिती देण्यात आली.

सदर जनजागृती मोहिमेदरम्यान प्रवाशांनी पोलिसांकडून देण्यात आलेले मार्गदर्शन लक्षपूर्वक ऐकून घेतले. प्रवाशांकडून उत्स्फूर्त व सकारात्मक प्रतिसाद मिळाला. सदर उपक्रमामुळे प्रवाशांमध्ये सायबर गुन्ह्यांबाबत जागरूकता निर्माण होऊन ऑनलाइन व्यवहार करताना आवश्यक ती सावधगिरी व सजगता बाळगण्याबाबत जनजागृती झाली.

सदर रेल्वे डॉमिनेशन व सायबर जनजागृती मोहीम यशस्वीरीत्या राबविण्यात आली.

Previous articleसंत गजानन महाराजांची ११६ वी पुण्यतिथी शेगावात उत्साहा’गण गण गणात बोते’च्या
Next articleशेतकऱ्यांच्या हक्कासाठी १६ सप्टेंबरपासून बेमुदत उपोषण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here