Home महाराष्ट्र बुलढाण्यात शुक्रवारी अंमली पदार्थ विरोधी मार्गदर्शन शिबिर

बुलढाण्यात शुक्रवारी अंमली पदार्थ विरोधी मार्गदर्शन शिबिर

7
0

बुलढाणा, (जिमाका) दि. 7: राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण नवी दिल्ली यांच्या ड्रग अव्हेरनेस अँड वेलनेस नेव्हीगेशन फार ड्रग फ्रि इंडीया (Drug Awareness and Wellness Navigation for Drug Free India) योजना 2025 अंतर्गत दि. 9 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3 वाजता राजर्षी शाहू औषध निर्माण महाविद्यालय, बुलढाणा येथे अंमली पदार्थ विरोधी मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

नार्कोटिक कंट्रोल ब्यूरोने अंमली पदार्थांच्या सेवनाविरुद्ध तयार केलेल्या “Say Yes to Life, No to Drugs” या घोषवाक्याच्या अनुषंगाने यावेळी शपथवाचन करण्यात येणार आहे. त्यानंतर अंमली पदार्थ व मनोव्यापारक पदार्थ अधिनियम, 1985(NDPS Act), औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व नियम 1945, अंमली पदार्थांचे सेवन, त्याचे दुष्परिणाम तसेच कायद्यातील तरतुदी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी न्यायाधीश नितीन पाटील राहणार असून प्रमुख मार्गदर्शक म्हणून, अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (औषधे), गजानन घिरके, केमिस्ट व ड्रगिस्ट संघटनाचे अध्यक्ष गजानन शिंदे तसेच राजर्षी शाहू औषध निर्माण महाविद्यालयाचे प्राचार्य शिरीष जैन उपस्थित राहणार आहे.

मार्गदर्शन शिबिर अन्न व औषध प्रशासन बुलढाणा, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण बुलढाणा, केमिस्ट व ड्रगिस्ट संघटना बुलढाणा तसेच राजर्षी शाहू औषध निर्माण महाविद्यालय बुलढाणा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आले आहे. या शिबिराचा विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन अन्न व औषध प्रशासनामार्फत करण्यात आले आहे.

Previous articleराष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत जिल्ह्यात तिळाचे 100 टक्के अनुदानावर बियाणे वितरण
Next articleमातृतीर्थ सिंदखेड राजात जिजाऊभक्तांचा जनसागर ! राष्ट्रमाता जिजाऊंचा ४२८ वा जन्मोत्सव थाटात साजरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here