Home महाराष्ट्र
3
0

शेगाव येथील श्री संत शितलनाथ महाराज संस्थान (धर्मशाळा) मध्ये महाशिवरात्रीचा उत्सव रविवारी मोठ्या उत्साहात आणि आनंदात साजरा करण्यात आला

श्री संत शितलनाथ महाराज संस्थान मध्ये सकाळी आठ वाजता पासून ते रात्री दहा वाजेपर्यंत फराळाचे अखंड वाटप चालू होते. फराळाचा हजारो भक्तांनी लाभ घेतला. महाशिवरात्रीनिमित्त श्री शितलनाथ महाराजांची गाव प्रदक्षिणा पालखी मिरवणूक काढण्यात आली
त्यानंतर संध्याकाळी आठ ते दहा पर्यंत श्री ह भ प कृष्णा महाराज सदाफळे यांचे कीर्तन झाले महाराजांनी कीर्तनामध्ये महाशिवरात्रीचे महात्म्य संतांची संगती नाथबाबा माऊली बद्दल दृष्टांत मांडले खूप उत्साहात कीर्तनाची सांगता झाली. किर्तन श्रवणाचा शेकडो भक्तांनी लाभ घेतला या कार्यक्रमाचा नियोजनात्मक भाग हा श्री शितलनाथ महाराज उत्सव समितीने पार पाडला.

Previous articleज्ञानेश्वर आखरे यांच्या लढ्याला यश; माळेगाव बाजार सरपंचांवर कारवाई, अपात्र घोषित
Next articleसंत सेवालाल महाराज जयंती उत्साहात साजरी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here