Home महाराष्ट्र बुलडाणा जिल्हा परिषदेत राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबाच्या शिल्पाच केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव...

बुलडाणा जिल्हा परिषदेत राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबाच्या शिल्पाच केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते अनावरण

6
0

बुलडाणा (जिमाका)
छत्रपती शिवाजी महाराजाचे आचार विचार गुण अंगीकारुण विकसीत भारताच्या निमितीमध्ये प्रत्यकांने योगदान द्यावे असे आवाहन केद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांनी केले

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या 396 व्या जयंती पर्वावर बुलढाणा जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीच्या मुख्य प्रवेशद्वारी राष्ट्रमाता जिजाऊ व बाल शिवबा यांच्या शिल्पाचे अनावरण आज केंद्रीय आयुषमंत्री प्रतापराव जाधव यांच्या हस्ते करण्यात आले . त्यांनी त्या आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते यावेळी आमदार संजय गायकवाड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरत बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीत राजपूत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे जिल्हाप्रमुख जालिंदर बुधवत चिखली अर्बन बहुउद्देशीय संस्थेचे सचिव डॉ आशुतोष गुप्ता जिल्हा परिषदेचे माजी सभापती दिलीप जाधव यांच्यासह जिल्हा परिषदेचे अधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते
वेळी पारंपारिक पद्धतीने शिवजन्म उत्सव साजरा करण्यात आला . पाळणा गित गाण्यात आले यावेळी केंद्रीयमंत्री प्रतापराव जाधव , आमदार संजय गायकवाड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात शिवसेना उबाठाचे जिल्हाप्रमुख जालींदर बुधवत यांनी पाळणा दोरी ओढून जन्म उत्सव सहभाग नोदविला .. जिल्हा परिषदेच्या आवारात एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी शिव पोवाडा , माऊली गित आणि आदिवाशी गित सादर करण्यात आले यावेळी आमदार संजय गायकवाड यांनी महाराजांच्या जिवन चरित्रवर प्रकाश टाकला राजमाता जिजाऊ यांनी दोन छत्रपती या स्वराजाला दिल्याचे सांगुन जाती पात मिटाविण्याचे काम सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ यांनी केल्याचे सांगुन त्यांना नमन केले या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते

Previous articleसंतनगरी शेगावात शिवजयंतीनिमित्त महिलांची प्रथमच मोटरसायकल रॅली व लेझीम पथकाचे प्रदर्शन
Next articleराष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे शेगांव येथे आगमन व स्वागत

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here