
बुलढाणा,(जिमाका)दि. 25 : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे आज सकाळी शेगांव येथील आनंद विहार हेलिपॅडवर आगमन झाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचे राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.
यावेळी केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव, केंद्रीय क्रीडा व युवा कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे, विभागीय आयुक्त डॉ. स्वेता सिंघल, विशेष पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोखले, जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील, पोलीस अधीक्षक निलेश तांबे, तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.








