Home महाराष्ट्र प्रभाग क्र. ९ मधील रस्त्यांच्या प्रश्नावर नागरिकांची एकी; नगरसेविकां सौ. सुषमा भिसेसह...

प्रभाग क्र. ९ मधील रस्त्यांच्या प्रश्नावर नागरिकांची एकी; नगरसेविकां सौ. सुषमा भिसेसह निवेदन

19
0

शेगाव : शेगाव शहरातील प्रभाग क्र. ९ मधील अंतर्गत रस्त्यांची दयनीय अवस्था लक्षात घेऊन प्रभागातील नागरिकांनी एकत्र येत नगर परिषदेकडे निवेदन सादर केले. या वेळी प्रभाग क्र. ९ मधील नागरिकांची एकी पाहायला मिळाली तसेच स्थानिक नगरसेवकही नागरिकांसोबत उभे राहिल्याचे चित्र दिसून आले.

हे निवेदन नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार यांना देण्यात आले. निवेदनात प्रभाग क्र. ९ मधील रस्त्यांची अवस्था मागील अडीच वर्षांपासून अत्यंत खराब झाल्याचे नमूद करण्यात आले. अनेक ठिकाणी मोठे खड्डे पडले असून काही ठिकाणी प्रॉपर्टी चेंबर झालेले नाहीत तसेच वॉटर पाईपलाईनही टाकण्यात आलेली नाही. त्यामुळे नागरिकांना दैनंदिन ये-जा करताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नागरिकांनी सांगितले.

निवेदन मिळताच नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार यांनी तात्काळ संबंधित कॉन्ट्रॅक्टरला बोलावून कामाचा आढावा घेतला. यावेळी पावसाळ्यापूर्वी ड्रेनेज लाईनसह रस्त्यांची कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे आश्वासन देण्यात आले.

निवेदन देताना प्रभाग क्र. ९ च्या नगरसेविका सौ. सुषमा भिसे, राजेंद्र भिसे तसेच प्रभागातील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते. नागरिकांच्या एकीमुळे आणि नगरसेवकांच्या सहकार्यामुळे प्रभागातील समस्या लवकर मार्गी लागेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.

Previous articleसंत नगरी शेगावमध्ये श्री श्याम फाल्गुन उत्सवाची भक्तिमय धूम
Next articleशेगावयेथील भिरडे लॉन मध्ये विकास स्वास्थ योग फाउंडेशन व ज्यूस जर्नी ग्रुप शेगाव यांच्या माध्यमातून प्राकृतिक रंगाचे होळी धुळवळ मंगळवारी साजरी करण्यात आली

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here