Home महाराष्ट्र शेगावयेथील श्री संत शितलनाथ महाराज धर्मशाळा फुले नगर माळीपुरा मध्ये हनुमान जयंतीचा...

शेगावयेथील श्री संत शितलनाथ महाराज धर्मशाळा फुले नगर माळीपुरा मध्ये हनुमान जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात आणि आनंदात विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन साज

4
0

श्री हनुमानजीं जन्म सोहळा सकाळी पाच वाजता भजना चेआयोजन जन्मोत्सव निमित्ताने करण्यात आले होते संध्याकाळी ह. भ .प. शुभम महाराज घोरपडे रा.खुटपुरी यांचे कीर्तन झाले. श्री संत शितलनाथ महाराज संस्थान मध्ये वार्षिक कीर्तनाचे कार्यक्रम आयोजित केलेले आहेत त्यामध्ये महाशिवरात्री रामनवमी हनुमान जयंती आषाढी एकादशी गोकुळाष्टमी कार्तिक एकादशी आणि श्री संत शितलनाथ महाराज पुण्यतिथी निमित्त श्रीमद् भागवत आणि दररोज रात्री आठ ते दहा कीर्तनाचे आयोजन केले जाते ह भ प शुभम महाराज घोरपडे यांनी यांच्या कीर्तनामध्ये श्री हनुमान जी च्या एकनिष्ठ भक्तीचा आणि कार्यपद्धतीचे उदाहरणासह स्पष्टीकरण खूप चांगल्या प्रकारे मांडले यांचे भगवान श्रीरामाबद्दल असलेली एकनिष्ठ भक्ती आणि त्यांचा दृढ विश्वास त्याच प्रकारची मानवी जीवनात कशा प्रकारचा सौधार्य करून घेता येते याचे स्पष्टीकरण त्यांनी कीर्तनात योग्य प्रकारे मांडले महाराजांनी प्रभू रामचंद्राच्या वनवासी जीवनामध्ये केलेल्या कार्यावर सुद्धा प्रकाश टाकला अशाप्रकारे हनुमान जी चा जन्मोत्सव श्री संत शितलनाथ महाराज संस्थांमध्ये उत्साहात करण्यात आला कार्यक्रम यशस्वी करता श्री संत शितलनाथ महाराज उत्सव समितीने परिश्रम घेतले.

Previous articleएकाच अवकाळी पावसाने एसबीआय कॉलनी, शेगाव येथील रस्त्यांची दयनीय अवस्था
Next articleमहसूल विभागाच्या सक्षमीकरणासाठी सुधारित आकृतीबंध मंजूर; बुलढाणा जिल्ह्यात नवीन कार्यालयांची निर्मिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here