Home महाराष्ट्र श्री ग.म.इंग्लिश स्कूलच्या विदयार्थ्यांचे शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये सुयश शेगांव

श्री ग.म.इंग्लिश स्कूलच्या विदयार्थ्यांचे शिष्यवृत्ती परिक्षेमध्ये सुयश शेगांव

36
0

दि.11 प्रतिनिधी स्थानिक, शेगांवच्या शैक्षणिक विश्वात तेजस्वी रोषणाई करणारी, सर्वच बाबतीत शिस्तप्रिय व गुणवत्तेचा उच्चांक गाठणारी श्री गजानन महाराज इंग्लिश स्कूल पुन्हा एकदा आपल्या यशाची पताका अभिमानाने फडकवत आहे. पुर्व प्राथमिक व प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षा 2026 चा निकाल नुकताच जाहीर झाला असुन. गुणवत्ता यादीमध्ये इयत्ता 5 वी चे एकुण 05 विद्यार्थी तसेच इयत्ता 8 वी चे एकुण 13 विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले आहे. इ. 5 वी मधुन मृन्मय अमृतराव वनारे 45 वा मेरीट, चैतन्य निलेश होनाळे 77 वा मेरीट, शर्विल सुधासु उमाळे 91 वा मेरीट, निधीश अभिजीत सुरोसे 138 वा मेरीट, गौरी सुरेश वानखडे 149 वा मेरीट आली असुन.. इयत्ता 8 वी मधुन विवेक सतिष बोडखे 04 था मेरीट, कु रिध्दी रमेश आळसी 06 वी मेरीट, खुशवंत चितामण देशमुख 10 वा मेरीट, स्वरीत सागर भुयारकर 19 वा मेरीट, कु श्रेयशी रविन्द्र निळे 20 वी मेरीट, कु लावण्या अनिलकुमार सुरोसे 31 वी मेरीट, कृष्णराज ज्ञानदेव धनोकार 40 वा मेरीट, कु सई अविनाश पाटील 41 वी मेरीट, कु सिध्दी रमेश आळसी 52 वी मेरीट, अनुज सुनिल पिसे 54 वा मेरीट, गजानन आत्माराम शेजोळे 65 वा मेरीट, पार्थ श्रीकृष्ण वाघ 96 वा मेरीट, कु रिध्दी शैलेष मिश्रा 119 वी मेरीट आली असुन शाळेच्या नावलौकिकात भर घातली आहे. या घवघवीत यशामागे शाळेच्या कुशल व्यवस्थापनाची दूरदृष्टी शिक्षकवृंदाची मेहनत, विद्यार्थ्याची चिकाटी आणि पालकांचे सतत सहकार्य हे घटक आहेत. विद्यार्थ्यानी आपल्या यशाचे श्रेय आपल्या आई वडील, शिक्षकवर्ग तसेच श्री गजानन महाराजांच्या कृपाशीर्वादाला दिले आहे. शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षकवृंद, शिक्षकेत्तर कर्मचारी, व संस्थेचे पदाधिकारी यांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्याचे मनपूर्वक अभिनंदन केले आणि त्यांना उज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

Previous articleनागझरी टाकळीतील मुख्य रस्त्याची दुरवस्था; शाळेसमोर पाणी साचल्याने विद्यार्थी व नागरिक त्रस्त
Next articleसोशल मीडियाच्या माध्यमातून घरातून निघालेली मुलगी रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुरक्षित; दोन्ही युवक-युवती पालकांच्या ताब्या

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here