
शेगाव, दि. 01 ऑगस्ट 2026 :-श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन अकोला येथे परत जात असलेल्या एका प्रवाशाचा ₹12,999/- किमतीचा रियलमी 40X मोबाईल रेल्वे स्थानकावरील बाकावर विसरला गेला होता. लोहमार्ग पोलिसांनी तत्परता दाखवत अल्पावधीत मोबाईलचा शोध घेऊन तो सुरक्षितपणे प्रवाशाच्या ताब्यात दिला.
प्रवासी पियुष देवेंद्र निचळ (वय 35 वर्ष), रा. डाबकी रोड, वानखेडे नगर, अकोला हे दि. 01/08/2026 रोजी श्री संत गजानन महाराजांचे दर्शन घेऊन रेल्वे स्टेशन शेगाव येथून अकोला जाण्यासाठी ट्रेन क्र. 12111 डाऊन अमरावती एक्सप्रेस मध्ये प्रवास करण्यासाठी चढले होते. गाडीत चढल्यानंतर त्यांना आपला रियलमी कंपनीचा लाल रंगाचा 40X मोबाईल (किंमत ₹12,999/-) प् लॅटफॉर्मवरील बाकावर विसरल्याचे लक्षात आले.
याबाबत माहिती मिळताच ASI/200 नारायण देवकर, ASI/76 सुनील कवळकर, HC/14 संजय चव्हाण व PC/82 किरण डोके यांनी तत्काळ प्लॅटफॉर्मवर धाव घेऊन मोबाईलचा शोध सुरू केला. कसून शोध घेतल्यानंतर सदर वर्णनाचा मोबाईल प्लॅटफॉर्मवर सुरक्षित अवस्थेत मिळून आला.
त्यानंतर मोबाईल लोहमार्ग पोलीस ठाणे, शेगाव येथे आणण्यात आला. मोबाईल धारक श्री. पियुष निचळ यांच्याशी संपर्क साधून त्यांना पोलीस ठाण्यात बोलाविण्यात आले. आवश्यक ताबा पावती घेऊन त्यांचा मोबाईल त्यांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आला.
मोबाईल परत मिळाल्याने श्री. पियुष निचळ यांनी लोहमार्ग पोलिसांच्या तत्परता, प्रामाणिकपणा आणि सेवाभावी कार्याबद्दल मनःपूर्वक आभार व्यक्त केले.
रेल्वे प्रवासादरम्यान आपल्या मौल्यवान वस्तूंची काळजी घ्यावी. कोणतीही वस्तू हरवल्यास अथवा संशयास्पद बाब आढळल्यास तात्काळ लोहमार्ग पोलिसांशी संपर्क साधावा, असे आवाहन प्रभारी अधिकारी विवेकानंद राळेभात, लोहमार्ग पोलीस ठाणे, शेगाव यांनी केले आहे.

