Home महाराष्ट्र ल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे प्रवाशाचा गहाळ झालेला ₹16,000/- किमतीचा मोबाईल परत

ल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे प्रवाशाचा गहाळ झालेला ₹16,000/- किमतीचा मोबाईल परत

33
0

शेगाव, दि. 10 ऑगस्ट 2026 :
अमरावती–पुणे एक्स्प्रेसने प्रवास करणाऱ्या प्रवाशाचा प्रवासादरम्यान गहाळ झालेला सुमारे ₹16,000/- किमतीचा OPPO कंपनीचा मोबाईल फोन रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे शोधून काढण्यात आला असून तो संबंधित प्रवाशाच्या नातेवाईकाच्या ताब्यात सुरक्षितपणे देण्यात आला आहे.

दि. 08/08/2026 रोजी रमेश पवार, रा. महेंद्र कॉलनी, अमरावती हे अमरावती–पुणे एक्स्प्रेसने प्रवास करीत असताना त्यांचा काळ्या रंगाचा OPPO कंपनीचा मोबाईल फोन प्रवासादरम्यान गहाळ झाला. सदर मोबाईलची अंदाजे किंमत ₹16,000/- असल्याचे त्यांनी सांगितले.

मोबाईल गहाळ झाल्याची माहिती मिळताच रेल्वे पोलीस ठाणे शेगाव येथील ASI/86 रेखा वानखेडे व पोहवा/584 मोहिते यांनी तत्काळ परिसरात मोबाईलचा शोध घेण्यास सुरुवात केली. शोध घेत असताना सदर वर्णनाचा मोबाईल रेल्वे किमी क्र. 547/21-23 जवळ मिळून आला.

सदर मोबाईल ताब्यात घेऊन पोहवा/125 डाबेराव यांच्याकडे जमा करण्यात आला. त्यानंतर मोबाईलवर आलेल्या क्रमांकावर संपर्क साधून चौकशी केली असता सदर मोबाईल हा रमेश पवार यांचाच असल्याची खात्री झाली.

रमेश पवार हे कामानिमित्त बाहेरगावी असल्याने त्यांनी त्यांचा मुलगा अवि रमेश पवार यास रेल्वे पोलीस ठाणे शेगाव येथे पाठविले. दि. 10/08/2026 रोजी आवश्यक ती खात्री करून सदर मोबाईल अवि रमेश पवार यांच्या ताब्यात सुरक्षितपणे देण्यात आला.

रेल्वे पोलिसांच्या तत्परता, कर्तव्यनिष्ठा व संवेदनशीलतेमुळे प्रवाशाचा गहाळ झालेला मौल्यवान मोबाईल अल्पावधीत शोधून काढून परत करण्यात आला. या कार्यवाहीबद्दल संबंधित प्रवाशाने रेल्वे पोलिसांचे आभार मानले.

सदर कार्यवाही श्री. विवेकानंद राळेभात, प्रभारी अधिकारी, रेल्वे पोलीस ठाणे शेगाव यांच्या मार्गदर्शनाखाली ASI/86 रेखा वानखेडे, पोहवा/584 मोहिते व पोहवा/125 डाबेराव यांनी तत्परतेने केली.

Previous articleपुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना;
Next article२१ ऑगस्ट रोजी ‘जलसंधारण दिन’; सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावे – मंत्री संजय राठोड

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here