पत्रकारांच्या पाल्यांचा गुणगौरव सोहळा

शेगांव:– आजच्या डिजिटल आणि स्पर्धात्मक युगात पत्रकार आपल्या
कर्तव्याबरोबरच कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे पार पाडत असतात. अशा पत्रकारांच्या पाल्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून आपल्या आई-वडिलांचा सन्मान वाढविला आहे. या गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव करून व्हॉइस ऑफ मीडिया व युवा क्रांती संघटनेने प्रेरणादायी उपक्रम राबविला असल्याचे गौरवोद्गार माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक शैलेंद्रदादा पाटील यांनी व्यक्त केले.
पत्रकार पाल्यांच्या गुणगौरव सोहळ्यात बोलताना ते म्हणाले की, अशा सत्कार कार्यक्रमांमुळे विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढतो, त्यांना अधिक जोमाने आणि जिद्दीने पुढे जाण्याची प्रेरणा मिळते. समाजातील गुणवंतांचा सन्मान करणे ही कौतुकास्पद बाब असल्याचेही त्यांनी नमूद केले.
दिनांक 25 जून गुरुवार रोजी सकाळी 11 वाजता श्री यादव बेकर्स येथे पत्रकारांच्या पाल्याचा गुणवत् सत्कार सोहळा संपन्न झाला या सोहळ्यात प्रमुख अतिथी माजी नगराध्यक्ष तथा नगरसेवक शैलेंद्र दादा पाटील, बांधकाम सभापती अंकुशबाप्पू देशमुख, शिक्षण सभापती सोनु मोहोळ, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष रामाभाऊ थारकर व डिजिटल मीडिया जिल्हा अध्यक्ष फईम देशमुख, व्हाईस ऑफ मीडियाचे तालुकाध्यक्ष नानाराव पाटील व युवा क्रांती संघटनेचे संस्थापक अध्यक्ष विजय यादव यांची प्रमुख उपस्थिती होती सदर कार्यक्रमांमध्ये गौरव महेंद्र व्यास, अनिरुद्ध नानाराव पाटील, सक्षम रवी शेकोकार ,कु. वैष्णवी दीपक सुरोशे ,कु. संस्कृती धनराज ससाने, कु दिव्या ललित देवपुजारी, कु. धनश्री अनिल उंबरकर व कुष्णकांत गजानन कलोरे या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सत्कार करीत ट्रॉफी देण्यात आली
या कार्यक्रमाच प्रास्ताविक पत्रकार नाना पाटील यांनी केले सूत्रसंचालन पत्रकार विठ्ठल अवताडे तर आभार प्रदर्शन समीर देशमुख यांनी केले
या कार्यक्रमाला तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष नंदूभाऊ कुलकर्णी, शेगाव प्रेस क्लब चेअध्यक्ष महेंद्रभाऊ मिश्रा, ज्येष्ठ पत्रकार संजयभाऊ सोनवणे, देवानंदभाऊ उमाळे, महेंद्रजी व्यास ,राजकुमार व्यास, दीपक सुरोशे, व्हाईस ऑफ मिडिया चे प्रकाशभाऊ उन्हाळे,दिनेशभाऊ महाजन , सचिव ज्ञानेश्वर टाकोते, दिनेशभाऊ घाटोळ,गणेश शेजोळे, मंगेश ढोले ,मोहम्मद रिजवान व गजाननभाऊ कलोरे, श्रीकांत कलोरे यांच्यासह युवा क्रांती संघटनेचे अमोल चव्हाण,अमर खराटे,किशोर देवकर,पवन रोमन, प्रशांत पवार,सोयम पांडे सह कार्यकर्ते उपस्थित होते. तसेच शेगाव शहरातील सर्व पत्रकार यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती
पत्रकारांच्या कुटुंबासाठी अभिमानाचा क्षण : अंकुशबापू देशमुख
समाजहितासाठी रात्रंदिवस कार्य करणाऱ्या पत्रकारांच्या पाल्यांनी शैक्षणिक क्षेत्रात उल्लेखनीय यश संपादन करून आपल्या कुटुंबाचा सन्मान उंचावला आहे. त्यामुळे हा क्षण संपूर्ण पत्रकार परिवारासाठी अभिमानास्पद असल्याचे गौरवोद्गार बांधकाम सभापती अंकुशबापू देशमुख यांनी व्यक्त केले. गुणवंत विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करत त्यांनी त्यांना उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

