Home महाराष्ट्र ३० जूनपर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करा; अन्यथा १० हजारांचा दंड

३० जूनपर्यंत वार्षिक विवरणपत्र दाखल करा; अन्यथा १० हजारांचा दंड

12
0

बुलढाणा/मुंबई, दि. 23 : प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम, २०२३ अंतर्गत नोंदणीकृत सर्व नियतकालिकांच्या प्रकाशकांनी आर्थिक वर्ष २०२४-२५ चे लेखापरीक्षित वार्षिक विवरणपत्र (Annual Statement) ३० जून २०२६ पर्यंत प्रेस सेवा पोर्टल (PSP) वर ऑनलाइन सादर करावे, असे आवाहन भारत सरकारच्या प्रेस रजिस्टर जनरल, नवी दिल्ली यांनी केले आहे.
प्रेस आणि नियतकालिक नोंदणी अधिनियम, २०२३ मधील कलम १४(१)(ब) आणि १४(३) नुसार प्रत्येक नोंदणीकृत नियतकालिकासाठी वार्षिक विवरणपत्र दाखल करणे बंधनकारक आहे. आर्थिक वर्ष २०२४-२५ चे विवरणपत्र अद्याप सादर न केलेल्या प्रकाशकांना ३० जून २०२६ पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली असून, यानंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
निर्धारित मुदतीत वार्षिक विवरणपत्र सादर न केल्यास संबंधित प्रकाशकांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. पहिल्या उल्लंघनासाठी किमान १० हजार रुपयांचा दंड आकारला जाईल. त्यानंतरच्या प्रत्येक उल्लंघनासाठी दंडाची रक्कम मागील दंडाच्या दुप्पट असेल. मात्र, एकूण दंडाची कमाल मर्यादा दोन लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे.
म्हणून आर्थिक वर्ष २०२४-२५ चे वार्षिक विवरणपत्र अद्याप दाखल न केलेल्या प्रकाशकांनी ३० जूनपूर्वी प्रेस सेवा पोर्टलवर ऑनलाइन विवरणपत्र सादर करून दंडात्मक कारवाई टाळावी, असे आवाहन प्रेस रजिस्टर जनरल यांनी केले आहे.

Previous articleउद्या कलमाच्या वारसांचा सन्मान: शेगावात गुणवंत पत्रकार पुत्रांचा सत्कार समारंभ !
Next articleबुलढाणा जिल्ह्यात २८ जून रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here