Home महाराष्ट्र मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार यादी ४...

मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर; अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबरला प्रसिद्ध होणार

8
0

बुलढाणा, दि. 20(जिमाका) : भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्रातील विधानसभा मतदारसंघांच्या मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचा सुधारित कार्यक्रम जाहीर केला आहे. १ ऑक्टोबर २०२६ ही पात्रता तारीख निश्चित करून राबविण्यात येणाऱ्या या प्रक्रियेत मतदान केंद्रांचे सुसुत्रीकरण आणि प्रारूप मतदार याद्या तयार करण्यासंबंधीची तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्याच्या उद्देशाने वेळापत्रकात ही सुधारणा करण्यात आली आहे.

        सुधारित वेळापत्रकानुसार मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण व पुनर्रचना २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे. त्यानंतर ३१ ऑगस्ट २०२६ रोजी प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे.  प्रारूप मतदार यादीसंदर्भात ३१ ऑगस्ट ते ३० सप्टेंबर २०२६ या कालावधीत दावे व हरकती दाखल करता येऊ शकतील. तसेच ३१ ऑगस्ट ते २९ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत प्राप्त दावे व हरकतींबाबत नोटीस देणे तसेच त्यांचा निपटारा करण्यात येईल.

        या संपूर्ण प्रक्रियेनंतर महाराष्ट्रातील अंतिम मतदार यादी ४ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात येणार आहे, असे भारत निवडणूक आयोगाने कळविले आहे.
Previous articleजिल्हाधिकारी कार्यालयात ‘सद्भावना दिवस’ साजरा
Next articleजलसंधारण दिन विशेष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here