Home महाराष्ट्र जिल्ह्यातील खरीप हंगामाची सुधारीत पैसेवारी जाहीर

जिल्ह्यातील खरीप हंगामाची सुधारीत पैसेवारी जाहीर

16
0

बुलढाणा, (जिमाका) दि. 3 : सन 2025-26 च्या खरीप हंगामातील बुलढाणा जिल्ह्यातील 1 हजार 420 गावाची सुधारीत पैसेवारी सरासरी 49 पैसे इतकी जाहीर करण्यात आली आहे. यातील 1 हजार 122 गावांची खरीप हंगामाची पैसेवारी 50 पैशांपेक्षा कमी आहे. तर 298 गावांची पैसेवारी ही 50 पैशांपेक्षा जास्त आहे.

50 पैसेपेक्षा कमी अंतिम पैसेवारी असलेले गावे : बुलढाणा तालुक्यात 98, चिखली येथे 144, देऊळगाव राजा येथे 64, मेहकर येथे 161, लोणार येथे 91, सिंदखेड राजा येथे 114, मलकापूर येथे 73, नांदुरा येथे 112, खामगाव येथे 146, जळगांव जामोद येथे 119 असे एकूण 1 हजार 122 गावांची पैसेवारी ही 50 पैशांपेक्षा कमी आहे.

50 पैसेपेक्षा जास्त अंतिम पैसेवारी असलेले गावे: मोताळा येथे 120, शेगांव येथे 73 व संग्रामपूर येथे 105 असे एकूण 298 गावे गावांची पैसेवारी ही 50 पैशांपेक्षा जास्त आहे.

Previous articleसुशिक्षित बेरोजगार युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी;बुलढाणा येथे पाच दिवसीय पशुपालन प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
Next articleजिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुक; अंतीम मतदार यादी प्रसिद्ध

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here