Home महाराष्ट्र पत्रकार हा समाजाचा आरसा – नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार

पत्रकार हा समाजाचा आरसा – नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार

10
0

व्हॉईस ऑफ मीडियाकडून अभिवादनाचा कार्यक्रम उत्साह

शेगाव – पत्रकार हा समाजाचा आरसा आहे. समाजातील विविध घटकांचे दुखणे जाणून घेऊन तो त्यावर आवाज उठवतो पत्रकार समाजामध्ये प्रमुख भूमिका बजावत असतो असे मत नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार यांनी व्यक्त केले. शेगाव व्हाइस ऑफ मिडिया शेगाव तालुका व शहर कार्यकारिणीच्या वतीने ६ जानेवारी रोजी पत्रकार दिन कार्यक्रमाचे आयोजन विश्वनाथ नगर येथील भव्य प्रगणात केले होते यावेळी ते बोलत होते.पुढे बोलतांना नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार म्हणाले की समाजातील विविध प्रश्न निर्भयपणे मांडून त्या सोडविण्यासाठी पुढाकार घेणे ही मोठी जबाबदारी पत्रकार पार पाडत आहेत, समाज मनाचा आरसा बनून पत्रकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा वैचारिक वारसा प्रामाणिकपणे पुढे नेत असल्याचे मत नगराध्यक्ष शेगोकार यांनी केले.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रपती पुरस्कार प्राप्त ह.भ.प. ज्ञानेश्वर मिरगे, प्रमुख उपस्थिती म्हणून नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश उन्हाळे, समाजसेवक रामेश्वरअण्णा सोळंके आदींची उपस्थिती होती.
पत्रकारिता करतांना पत्रकारांना येणाऱ्या अळचणी याबाबत जेष्ठ पत्रकार फहीम देशमुख, व विजय यादव यांनी सखोल मार्गदर्शन केले.तसेच आजचे युग हे स्पर्धेचे आणि वेगाने बदलणारे युग आहे. या बदलत्या काळात पत्रकारितेचे स्वरूप पूर्णपणे बदलले असून ती आता डिजिटल झाली आहे. मात्र, स्वरूप बदलले तरी पत्रकार हा आजही समाजाच वास्तव दाखवणारे असून सामान्यांचे प्रश्न मांडण्याचे ते सर्वात प्रभावी ठिकाण आहे असे मत ह.भ.प. ज्ञानेश्वर मिरगे यांनी मार्गदर्शन करताना म्हटले.यावेळी
चौकट:– पत्रकार स्व. संजय ठाकूर यांना मरणोत्तर सन्मान व श्रद्धांजली
अभिवादनाच्या कार्यक्रमात सुरुवातीलाच सर्व उपस्थितांकडून तसेच
व्हाइस ऑफ मिडियातील पत्रकारांच्या वतीने जेष्ठ पत्रकार स्वर्गीय संजय ठाकूर यांचे प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून सामुहिक श्रद्धांजली वाहण्यात आली. व स्व.संजय ठाकूर त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना मरणोत्तर सन्मान त्यांचे चिरंजीव अंकुश ठाकूर यांना प्रधान करण्यात आला
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडताना व्हॉईस ऑफ मिडिया तालुका अध्यक्ष नानाराव पाटील यांनी गत तीन वर्षात व्हाईस ऑफ मीडियांनी पत्रकार व पत्रकार यांच्या पाल्यांन साठी कसे कार्य करते व यावेळी आयुष्य कार्ड काढण्यात आल्या च्या महत्वपूर्ण बाबीवर प्रकाश टाकला,
कार्यक्रमाचे संचलन विठ्ठल अवताडे, तर आभार ज्ञानेश्वर ताकोते यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी पत्रकार राजवर्धन शेगावकर,दिनेश महाजन, अमर बोरसे ,सतीश अग्रवाल ज्ञानेश्वर ताकोते, समीर देशमुख,, सुधाकर बावस्कर, रवि शेगोकार ,ललित देवपुजारी, दिनेश घाटोळ, समीर शेख, मंगेश पाटील, अंकुश ठाकुर,ऋषभ शेजोळे आदींनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात शेगावचे सुप्रसिद्ध आर्किटेक् प्रतीक भगत यांनी या कार्यक्रमात येऊन पत्रकारांना भेट वस्तू देऊन सन्मान केला.
यावेळी विश्वनाथ नगर मधील नागरिक व महिलांनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला होता.

Previous articleमहाराष्ट्रात ५९ व्या निरंकारी संत समागमाची पूर्व तयारी उत्साहपुर्वक
Next articleराष्ट्रीय खाद्य तेल अभियानांतर्गत जिल्ह्यात तिळाचे 100 टक्के अनुदानावर बियाणे वितरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here