Home महाराष्ट्र एकफळ येथे संगीतमय श्रीमद्भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन

एकफळ येथे संगीतमय श्रीमद्भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन

9
0

शेगांव प्रतिनिधी – हिंदू नववर्ष चैत्र नवरात्री व गुढीपाडव्याच्या पावन पर्वानिमित्त एकफळ येथील श्री विंध्याचल माता मंदिर परिसरात संगीत्यमय श्रीमद्भागवत ज्ञानयज्ञ सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.
हा ज्ञानयज्ञ १९ मार्चपासून सुरू होऊन २५ मार्चपर्यंत विविध धार्मिक कार्यक्रमांनी संपन्न होणार आहे.
या ज्ञानयज्ञात कथा व्यास म्हणून उज्ज्वल कृष्ण महाराज यांच्या सुश्राव्य वाणीतून भागवत कथामृताचे रसग्रहण भाविकांना होणार आहे. सप्ताहादरम्यान दररोज विविध धार्मिक प्रसंगांवर आधारित भागवत कथा, संवाद, महात्म्य व विशेष उत्सव साजरे करण्यात येणार आहेत.
कार्यक्रमाचे स्वरूप पुढीलप्रमाणे राहणार आहे. १९ मार्च रोजी श्रीमद्भागवत महात्म्य व मंगलाचरण, २० मार्च रोजी नारद-व्यासी संवाद व पांडव चरित्र, २१ मार्च रोजी कपीळ देवहूती संवाद व सती चरित्र, २२ मार्च रोजी वामन अवतार व श्रीराम जन्म तसेच श्रीकृष्ण जन्मोत्सव, २३ मार्च रोजी श्रीकृष्ण बाललीला व गोवर्धन पूजा, २४ मार्च रोजी महारास कथा व श्रीकृष्ण-रुक्मिणी विवाह सोहळा, तर २५ मार्च रोजी सुदामा चरित्र, परीक्षित मोक्ष व हवनपूजनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
महाप्रसादीचे आयोजन २६ मार्च रोजी दुपारी करण्यात येणार असून मोठ्या संख्येने भाविकांनी उपस्थित राहून प्रसादाचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.
हा संपूर्ण कार्यक्रम श्री विंध्याचल माता मंदिर ट्रस्ट, एककाळ यांच्या वतीने आयोजित करण्यात आला आहे.

Previous articleकृतज्ञता’पाणी ठेवा, पक्षी वाचवा’; राहत्या घरी दाणे, पाणी ठेवण्याचे आवाहन
Next articleश्री संत गजानन महाराज संस्थान जागतिक दर्जाचे स्वच्छ, सुंदर व सेवाभावी — उज्वल श्रीकृष्ण महाराज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here