Home महाराष्ट्र शेगावात शहीद दिनानिमित्त भव्य रॅली : शेकडो युवकांचा सहभाग

शेगावात शहीद दिनानिमित्त भव्य रॅली : शेकडो युवकांचा सहभाग

9
0

शेगावं – युवा कार्यक्रम खेल मंत्रालय भारत सरकार अंतर्गत असलेले मेरा युवा भारत बुलढाणा व नंद फाउंडेशन शेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने 23 मार्च रोजी शहीद दिनानिमित्त देशासाठी शहीद झालेले वीरांना श्रद्धांजली देत त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी शेगाव शहरात भव्य रॅलीचे आयोजन मेरा युवा भारतचे स्वयंसेवक सुरज मार्तंडराव बोरसे यांनी केले होते. यावेळी शेगावचे नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार यांच्या हस्ते हिरवी झेंडी देऊन रॅलीला सुरुवात करण्यात आली.
या रॅली मध्ये शेकडो युवक युवतीनी सहभागी होत वंदे मातरम, इन्कलाब जिंदाबाद, अमर रहे.. अमर रहे.. शहीद जवान अमर रहे.. भारत माता की जय.. असे गगनभेदी नारे दिले. सदर रॅली शेगाव शहरातील मुख्य चौकातुन काढण्यात आली होती.
यावेळी नगराध्यक्ष प्रकाश शेगोकार यांनी आपण आपल्या देशासाठी प्राणांची आहुती देणाऱ्या सर्व शूर वीरांना कृतज्ञतापूर्वक अभिवादन करतो. त्यांच्या त्याग, शौर्य आणि देशभक्तीमुळेच आपण आज स्वातंत्र्य, सुरक्षितता आणि सन्मानाने जगत आहोत. शहीदांचे बलिदान हे केवळ इतिहासापुरते मर्यादित नसून, ते प्रत्येक नागरिकासाठी प्रेरणादायी आहे. त्यांच्या आदर्शांचा वारसा जपत आपण आपल्या कर्तव्यांची जाणीव ठेवून समाज आणि राष्ट्राच्या प्रगतीसाठी योगदान देणे, हीच त्यांना खरी आदरांजली ठरेल. आपण सर्वांनी एकजुटीने देशाच्या ऐक्य, अखंडता आणि विकासासाठी कटिबद्ध राहण्याची प्रतिज्ञा करूया. शहीदांचे स्मरण हे केवळ शब्दांपुरते न राहता कृतीतून दिसले पाहिजे, असे मत व्यक्त केले. तर मध्ये तिरंगा ध्वज, श्रद्धांजली नारे फलक होते लक्ष वेधून घेत होते. यावेळी नंद फाउंडेशनचे संचालक प्रा. नंदलाल उन्हाळे, पत्रकार अमर बोरसे, मयूर ठाकरे, सुरज पोटे, शंकर कराळे, पुनम उन्हाळे, माणिक भटकर, नितीन क्षीरसागर, गणेश गिरे, विठ्ठल पिसे, सचिन बेलोकार, नरेश ताजने, दर्शन गवई तसेच चि. राजवर्धन उन्हाळे, मेरा युवा भारत शेगाव तालुका स्वयंसेवक सुरज बोरसे उपस्थित होते. युवकांनी राष्ट्रहिताचे व एकात्मता ठेऊन देशसेवेसाठी कार्य करावे असे मत जवाहरलाल उन्हाळे रॅलीच्या समारोपीय कार्यक्रमात व्यक्त केले. यावेळी शेकडो युवक युवती रॅलीत सहभागी झाले होते.

Previous articleश्री संत गजानन महाराज संस्थान जागतिक दर्जाचे स्वच्छ, सुंदर व सेवाभावी — उज्वल श्रीकृष्ण महाराज
Next articleशेगाव येथे 28 ते 30 मार्च दरम्यान सामाजिक न्याय योजनांचे मल्टिमिडिया छायाचित्र प्रदर्शनीनागरिकांनी लाभ घ्यावा; जिल्हा माहिती कार्यालयाचे आवाहन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here