Home महाराष्ट्र उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले

उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले

13
0

बुलढाणा दि. 11 (जिमाका): उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयामार्फत राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास, नागरिकांना उत्तम ग्रंथालयीन सेवा आणि वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी “डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय पुरस्कार” तसेच “डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार”दिला जातो. सन २०२५-२६ च्या पुरस्कारासाठी इच्छुक शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांनी तसेच ग्रंथालय कार्यकर्ते व सेवक (ग्रंथमित्र) यांनी विहित नमुन्यातील प्रस्ताव आवश्यक कागदपत्रांसह तीन प्रतींमध्ये दि. २५ सप्टेंबर २०२६ पर्यंत जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावेत, असे आवाहन ग्रंथालय संचालनालयाचे प्रभारी ग्रंथालय संचालक अशोक मा. गाडेकर यांनी केले आहे.

सन २०२५-२६ या वर्षासाठी राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील अ, ब, क व ड वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांची पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. निवड झालेल्या ग्रंथालयांना अनुक्रमे १ लाख, ७५ हजार, ५० हजार आणि २५ हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र तसेच ग्रंथभेट देऊन गौरविण्यात येणार आहे.

याशिवाय राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता आणि एक उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी ५० हजार रुपये रोख पुरस्कार देण्यात येईल. तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातून प्रत्येकी एका उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्त्यास आणि एका उत्कृष्ट ग्रंथालय सेवकास २५ हजार रुपये रोख रक्कम, सन्मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि ग्रंथभेट देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. या पुरस्कारांचा उद्देश ग्रंथालय चळवळीत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या संस्था, कार्यकर्ते व सेवकांना प्रोत्साहन देणे आणि समाजात वाचनाची आवड वाढविण्यास हातभार लावणे हा आहे.

Previous articleविशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण; राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न
Next articleपालक अधिकारी डॉ. संतोष कडले यांची आरोग्य संस्थांना भेट;‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here