शेगाव शहर पोलीस ठाण्यात वैभव दीपक देशमुख (वय 32, व्यंकटेश नगर, शेगाव) यांनी तक्रार दिली की, 28 जून 2026 रोजी सायंकाळी 4:30 वाजता श्रीराम इन्स्टिट्यूट, शेगाव येथील गोदामातून नाफेडची तूर चोरीला गेली.गोदामातील 26 कट्ट्यांपैकी 13 क्विंटल तूर (26 कट्टे × 50 किलो), अंदाजे ₹1,14,400 किंमतीची तूर अज्ञात चोरट्यांनी गोदामाचे कुलूप तोडून चोरून नेली.तपासादरम्यान गुन्हे प्रकटीकरण पथकाने सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे एमएच-04 जीसी-3430 क्रमांकाच्या टाटा एस वाहनाचा शोध घेतला. चौकशीत खालील आरोपींना अटक करण्यात आली:विजय राधेश्याम अग्रवाल (वय 32, रा. शेगाव)शेख उमर शेख जमीर (वय 23, रा. आळसणा, ता. शेगाव)जप्त मुद्देमाल:13 क्विंटल तूर – ₹1,14,400टाटा एस वाहन (MH-04 GC-3430) – ₹1,50,00015 जूट बारदाणे (₹100 प्रति कट्टा) – ₹1,500एकूण जप्त मुद्देमाल: ₹2,65,900ही कारवाई पोलीस अधीक्षक निलेश तांबे, अपर पोलीस अधीक्षक पियुष जगताप, उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील, पोलीस निरीक्षक निर्मय मेहेंदळे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण पथकाने केली.



