शेगांव दि. 8 प्रतिनिधी / जवाहर नवोदय विद्यालय, शेगाव, जि. बुलढाणा यांच्यातर्फे कळविण्यात आले आहे की, JNVST 2027 इयत्ता 6 वी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख 10 ऑगस्ट 2026 पर्यंत वाढविण्यात आली आहे. तसेच, भरलेल्या अर्जामध्ये आवश्यक दुरुस्ती करण्यासाठी Correction Window दिनांक 11 व 12 ऑगस्ट 2026 रोजी उपलब्ध राहणार आहे. बुलढाणा जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागातील पात्र विद्यार्थ्यांना या महत्त्वाच्या संधीची लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे

