Home महाराष्ट्र शासकीय वसतिगृहातील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

शासकीय वसतिगृहातील प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

24
0

बुलढाणा दि. 11 (जिमाका): इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत शासकीय वसतिगृहांमध्ये शैक्षणिक वर्ष २०२६-२७ साठी व्यावसायिक व अव्यावसायिक अभ्यासक्रमांना प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. पात्र विद्यार्थ्यांनी प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.

बारावीनंतर उच्च शिक्षण घेणाऱ्या नव्याने प्रवेशित विद्यार्थ्यांसाठी शासकीय वसतिगृह प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार ७ ऑगस्ट ते ३१ ऑगस्ट २०२६ या कालावधीत ऑनलाइन अर्ज करता येणार आहेत. अर्जांची छाननी १ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात येणार असून, पहिली निवड यादी ८ सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. पहिल्या निवड यादीतील विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्याची अंतिम मुदत १८ सप्टेंबर २०२६ आहे. रिक्त जागांवर प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांची निवड २१ सप्टेंबर २०२६ रोजी करण्यात येणार असून, दुसरी निवड यादी ३० सप्टेंबर २०२६ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे.

बुलढाणा जिल्ह्यातील मुलींच्या शासकीय वसतिगृहात एकूण १०० जागा उपलब्ध असून, त्यापैकी इतर मागास वर्ग (इमाव) ५१, विजाभज ३३, विमाप्र ६, दिव्यांग ४, अनाथ २ आणि आर्थिक मागास प्रवर्ग (EWS) ४ जागा आहेत. सध्या यापैकी ५३ जागा रिक्त आहेत. तसेच मुलांच्या शासकीय वसतिगृहातही एकूण १०० जागा असून, इमाव ५१, विजाभज ३३, विमाप्र ६, दिव्यांग ४, अनाथ २ आणि EWS ४ जागांचे आरक्षण आहे. यापैकी २२ जागा रिक्त आहेत.

सर्व शासकीय वसतिगृहांमधील प्रवेश प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने राबविण्यात येत असून, पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत अर्ज भरून या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन सहायक संचालक दत्तात्रय वाघ यांनी केले आहे.

Previous articleरेल्वे प्रकल्पाला गती देण्यासाठी उच्चस्तरीय संयुक्त बैठक घेण्याची केंद्रीय राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांची मागणी
Next articleविशेष सखोल पुनरीक्षणांतर्गत मतदान केंद्रांचे सुसूत्रीकरण; राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींची बैठक संपन्न

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here