Home महाराष्ट्र “उत्कृष्ट सेवा पदकाने” पोलिस हवालदार योगेश आसोलकार सन्मानित

“उत्कृष्ट सेवा पदकाने” पोलिस हवालदार योगेश आसोलकार सन्मानित

35
0

शेगांव/प्रतिनिधी-
‘श्रीं’ च्या पदस्पर्शाने पुनित झालेल्या विदर्भ पंढरी शेगांव शहरातील मुळ रहिवासी असलेले पोलिस हवालदार योगेश सुरेश आसोलकार यांना भारत सरकार,गृह मंत्रालयाकडुन ८० व्या स्वातंत्र्यदिनी १५ ऑगस्ट उत्कृष्ट सेवा पदकाने १७ वर्षे दिर्घकालीन व निष्कलंक सेवेची दखल घेत सन्मानित करण्यात आले. पो.हवा. योगेश आसोलकार यांना मिळालेल्या सन्मानमुळे त्यांच्या त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन होत आहे.
महाराष्ट्र राज्याचे महसुल मंत्री तथा नागपुर चे पालकमंत्री ना.श्री.चंद्रशेखर बावनकुळे यांचे सह विभागीय आयुक्त श्रीमती विजयालक्ष्मी बिरदी मॅडम, पोलिस आयुक्त विश्वास नांगरे पाटील, वि.पो.म.नी.संदीप पाटील,वि.पो.म.नी.निसार तांबोळी, मनपा आयुक्त इटनकर सर, तथा नागपुर शहर तथा विभागातील वरिष्ठ पोलिस आणि महसुल प्रशासनील अधिकारी उपस्थित होते ‘उत्कृष्ट सेवा पदकाने पोलिस हवालदार योगेश आसोलकार यांना नागपुर येथे आयोजित विभागीय आयुक्त कार्यालय येथे हा सत्कार सोहळा संपन्न झाला.
उल्लेखनीय असे की, पो.ह.योगेश आसोलकार यांना प्रदिर्घ, निष्कलंक व उल्लेखनीय सेवेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडुन तब्बल ३०९ वेळा विविध बक्षिसांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.
पो.ह.योगेश आसोलकार यांनी भारतीय राखीव बटालियन-||,एस.आर.पी.एफ गट क्र.XV ,बिरसी कॅम्प, गोंदिया येथे पोलिस शिपाई म्हणुन सेवा सुरू केली असुन ते सद्द्या पोलीस प्रशिक्षण केंद्र, नागपूर येथे कार्यरत आहेत. त्यांनी आजपर्यंत अत्यंत निष्ठेने व शिस्तबद्धपणे कर्तव्य बजावले आहे. त्यांनी कायदा व सुव्यवस्था,व्हि.आय.पी.बंदोबस्त तसेच विविध संवेदनशील बंदोबस्तामध्ये उत्कृष्ट कामगिरी केली असुन गडचिरोली व गोंदिया जिल्ह्यातील नक्षलविरोधी अभियानात एल.आर.पी.एस.आर.पी.एरिया डॉमिनेशन व पोस्ट सिक्युरिटीची जबाबदारी प्रभावीपणे पार पाडली आहे.उत्तर प्रदेश व गोवा राज्यातील निवडणुक बंदोबस्तासह विविध आव्हानात्मक परिस्थितीत त्यांनी उल्लेखनीय कार्यक्षमता व धैर्य दाखविले आहे.एम.टी.,
एच.ई.ग्रेनेड, ॲन्टी-सॅबोटाज,
व ड्रिल इन्स्ट्रक्टर यांसह विविध प्रशिक्षणक्रम यशस्वीरित्या पुर्ण करून सद्या प्रशिक्षण केदात उत्कृष्ट सेवा देत आहेत.
त्यांच्या प्रदिर्घ,निष्कलंक व उल्लेखनीय सेवेसाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडुन त्यांचे कौतुक केले जात आहे. “उत्कृष्ट सेवा पदकाने त्यांना सन्मानित करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Previous articleजिल्हा युवा पुरस्काराने सुरज बोरसे यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान…
Next articleमृद व जलसंवर्धनासाठी ‘रील फॉर साईल ॲण्ड वॉटर कन्झर्वेशन’ स्पर्धेत युवकांनी सहभाग घ्यावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here