Home महाराष्ट्र पालक अधिकारी डॉ. संतोष कडले यांची आरोग्य संस्थांना भेट;‘माझे गाव, आरोग्य संपन्न...

पालक अधिकारी डॉ. संतोष कडले यांची आरोग्य संस्थांना भेट;‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या अंमलबजावणीचा घेतला आढावा

11
0

बुलढाणा दि. 11 (जिमाका): पालक अधिकारी जिल्हा बुलढाणा तथा प्राचार्य आरोग्य व कुटुंब कल्याण प्रशिक्षण केंद्र, छत्रपती संभाजीनगर डॉ. संतोष कडले यांनी दि. ५ ऑगस्ट रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र, अंढेरा तसेच ग्रामीण रुग्णालय, देऊळगाव राजा येथे भेट देऊन आरोग्य सेवांचा सविस्तर आढावा घेतला.

यावेळी महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ या महत्त्वाकांक्षी अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीबाबतही आढावा घेण्यात आला. अभियानाच्या माध्यमातून नागरिकांना गुणवत्तापूर्ण व सर्वसमावेशक प्राथमिक आरोग्य सेवा उपलब्ध करून देणे, विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करणे तसेच आरोग्य संस्थांची कार्यक्षमता वाढविण्याबाबत संबंधितांना मार्गदर्शन करण्यात आले.

भेटीदरम्यान विविध राष्ट्रीय आरोग्य कार्यक्रमांची अंमलबजावणी, रुग्णसेवा, औषधसाठा, स्वच्छता, गुणवत्ता व्यवस्थापन आणि उपलब्ध आरोग्य सुविधांची पाहणी करण्यात आली. आरोग्य सेवा अधिक प्रभावी, गुणवत्तापूर्ण व नागरिकाभिमुख करण्यासाठी संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ अभियानाच्या माध्यमातून गावपातळीवरील आरोग्य सुविधा अधिक सक्षम करून प्रत्येक नागरिकापर्यंत दर्जेदार आरोग्य सेवा पोहोचविण्यावर विशेष भर देण्यात यावा, असे मार्गदर्शन पालक अधिकारी डॉ. संतोष कडले यांनी केले. या भेटीदरम्यान जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ. मिलिंद जाधव तसेच जिल्हा गुणवत्ता आश्वासन समन्वयक डॉ. मनीष इंगळे उपस्थित होते.

Previous articleउत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय व ग्रंथमित्र पुरस्कारासाठी २५ सप्टेंबरपर्यंत प्रस्ताव मागविले
Next articleमहाडिबीटी अर्ज नोंदणीबाबत महाविद्यालयांच्या प्राचार्यांना मार्गदर्शन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here