Home महाराष्ट्र रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे प्रवाशाचा ₹32 हजारांचा मोबाईल सुखरूप परत

रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे प्रवाशाचा ₹32 हजारांचा मोबाईल सुखरूप परत

32
0

शेगाव , दि. 17 ऑगस्ट 2026 : रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे रेल्वे प्रवासादरम्यान विसरलेला ₹32,000/- किमतीचा विवो कंपनीचा मोबाईल प्रवाशाला सुखरूप परत मिळाला.

दिनांक 17/08/2026 रोजी प्रवासी डॉ. व्यंकट नरसिंगराव भोसले, वय 45 वर्षे, रा. अकोला हे ट्रेन क्रमांक 17631 नांदेड–मलकापूर एक्स्प्रेस मधून कोच क्रमांक A/2, बर्थ क्रमांक 11 वरून प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान त्यांचा विवो कंपनीचा मोबाईल रेल्वे डब्यातच विसरून राहिला.

याबाबत G.P.S.I. कैलास तायडे यांनी दूरध्वनीद्वारे माहिती दिल्यानंतर, मलकापूर रेल्वे स्थानकावर कर्तव्यावर असलेले पोलीस हवालदार /463 खंडागळे यांनी तात्काळ सदर गाडी अटेंड करून प्रवाशाचा मोबाईल शोधून सुरक्षितपणे ताब्यात घेतला.

त्यानंतर डॉ. भोसले यांना लोहमार्ग पोलीस ठाणे,शेगाव येथे बोलावून आवश्यक खात्री करून ₹32,000/- किमतीचा मोबाईल सुखरूप त्यांच्या ताब्यात देण्यात आला.*

लोहमार्ग पोलिसांच्या या तत्पर व संवेदनशील कार्यवाहीबद्दल डॉ. भोसले यांनी लोहमार्ग पोलिसांचे मनःपूर्वक आभार मानले.

सदर कार्यवाही सहा.पोलिस निरीक्षक विवेकानंद राळेभात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार 463 खंडागळे व G.P.S.I. कैलास तायडे,ASI/देवकर यांनी यशस्वीरीत्या पार पाडली.

रेल्वे प्रवाशांच्या मालमत्तेची सुरक्षा तसेच हरविलेल्या वस्तूंचा तात्काळ शोध घेऊन त्या संबंधित प्रवाशांना परत करण्यासाठी लोहमार्ग पोलीस सदैव तत्पर आहेत.

Previous article‘एकात्मिक आरोग्यवर्धिनी’ आढावा बैठक संपन्न; कुपोषणमुक्ती आणि १०० टक्के आरोग्य तपासणीवर भर
Next articleजवाहर नवोदय विद्यालय येथे अमली पदार्थ जनजागृती कार्यक्रम संपन्न*

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here