Home महाराष्ट्र जिल्हा परिषद सर्कल माटरगाव जानोरी एस्सी सर्वसाधारण आरक्षण सुटल्याने निवडणुकीच्या रिंगणात युवा...

जिल्हा परिषद सर्कल माटरगाव जानोरी एस्सी सर्वसाधारण आरक्षण सुटल्याने निवडणुकीच्या रिंगणात युवा पत्रकार सागर सिरसाट यांची एन्ट्री

24
0

उच्चशिक्षित उमेदवार असल्याने जिल्हा परिषद सर्कलमध्ये मोठे बदल घडण्याचे चित्र

शेगाव – सविस्तर वृत्त असे की निवडणुकीची बिगुल वाजल्यानंतर सर्वच कार्यकर्ते तथा पदाधिकारी अनेक पक्षांचे कामाला लागले आहेत. अशातच कुठे राखीव जागा तर जिल्हा परिषद सर्कलमध्ये सर्वसाधारण जागा निघाल्या अशा त शेगाव तालुक्यातील माटेगाव जानोरी ही सर्कल एससी साठी सर्वसाधारण राखीव सुटल्याने. पत्रकार सागर सिरसाट यांच्या नावाची लढवण्याची चर्चा जिल्हा परिषद सर्कल मध्ये चालू आहे. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आंबेडकर पक्ष जिल्हाध्यक्ष सोशल मीडिया तथा जिल्हा कार्याध्यक्ष या पदावर सागर सिरसाट कार्यरत आहेत. युवा पत्रकार सागर सिरसाट यांचा स्थानिक पातळीवर युवा संपर्क तसाच जनसंपर्क दांडगा असल्याने पक्षाच्या निदर्शनास आले. आपल्या पत्रकारितेच्या माध्यमातून जनसामान्यांना न्याय देण्याचे काम त्यांच्या लेखणी द्वारे त्यांनी सतत केले आहे. तसे छोटे-मोठे आंदोलन पक्षाच्या वतीने उपोषणे सुद्धा मांडले व शासनाला प्रशासनाला धडा शिकवण्याचे काम निश्चितच केले. या बाबीचा सर्व आढावा घेऊन, पक्षाने विचार विनिमय करून, पक्षाच्या पक्षश्रेष्ठी यांनी निश्चितच जिल्हा परिषद सर्कल माटरगाव जानोरी ही सागर सिरसाट यांनी लढवावी. अशी अशा व्यक्त केली होती.त्या अनुषंगाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकी संदर्भात मुंबई येथे झालेल्या मीटिंगमध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष दीपक भाऊ निकाळजे पक्षाचे राष्ट्रीय महासचिव मोहनलालजी पाटील पक्षाचे कार्याध्यक्ष भूपेशजी थूलकर, यांच्या मार्गदर्शनाखाली मुंबई येथे छडा नगर, लक्ष्मी बंगलो येथे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीविषयी राज्यस्तरीय सदस्यांची बैठक पार पडली. या बैठकीमध्ये प्रामुख्याने महाराष्ट्रातील महाराष्ट्र कार्याध्यक्ष बाळासाहेब पवार, राज्य उपाध्यक्ष दादासाहेब ओव्हाळ, विदर्भ कार्याध्यक्ष राजेंद्र नितनवरे, पश्चिम विदर्भ अध्यक्ष तथा बुलढाणा जिल्हाध्यक्ष संतोष इंगळे, सोशल मीडिया अध्यक्ष तथा जिल्हा कार्याध्यक्ष सागर सिरसाट आणि इतर मोक्याचे पदाधिकारी उपस्थित होते. अशात जिल्हा परिषद माटरगाव जानोरी सर्वसाधारण एसटी प्रवर्गातून निघाल्यामुळे पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद सर्कल साठी अधिकृत निवडणूक लढवावी असे पक्षाच्या पक्षश्रेष्ठी यांनी स्पष्ट केले..
स्थानिक ठिकाणी युतीच्या संदर्भात कार्यकर्ते तथा पदाधिकारी उमेदवार यांना कळविण्यात येईल तसेच युतीचा मुद्दा यावर राष्ट्रीय अध्यक्ष लक्ष देतील राष्ट्रीय महासचिव मोहनलाल पाटील यांनी संबोधित केले.

Previous articleनगरपरिषद सार्वत्रिक निवडणूक २०२५
Next articleनगराध्यक्ष पदाकरिता प्रकाश वानखेडे यांचा प्रभावी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here