Home महाराष्ट्र शेगावातील Zudio क्रॉसिंगवर अपघात; स्पीडब्रेकरची मागणी पुन्हा ऐरणीवर

शेगावातील Zudio क्रॉसिंगवर अपघात; स्पीडब्रेकरची मागणी पुन्हा ऐरणीवर

26
0

शेगाव : शहरातील Zudio जवळील Hero शोरूम क्रॉसिंग परिसरात आज चारचाकी वाहनाने दुचाकीला धडक दिल्याची घटना घडली. या अपघातात दुचाकीस्वार जखमी झाला असून त्याला उपचारासाठी माऊली रुग्णालयात दाखल करण्यात आले.अपघातानंतर जखमी व्यक्तीला धडक देणाऱ्या त्याच चारचाकी वाहनातून रुग्णालयात नेण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.Zudio क्रॉसिंग ठरतोय अपघातप्रवण ठिकाणZudio–Hero शोरूम परिसरातील हा क्रॉसिंग गेल्या काही काळापासून अपघातप्रवण ठिकाण म्हणून ओळखला जात आहे. या मार्गावर वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणात असून, क्रॉसिंगवरून वाहने वेगाने ये-जा करत असल्याने अपघाताचा धोका कायम आहे.या ठिकाणी स्पीडब्रेकर बसविण्याची मागणी होत असतानाही अद्याप ठोस उपाययोजना झालेली नाही, अशी नागरिकांची नाराजी आहे.प्रशासनाने तातडीने उपाययोजना करण्याची मागणीZudio क्रॉसिंग परिसरात स्पीडब्रेकर, योग्य दिशादर्शक फलक, रस्ता सुरक्षा चिन्हे तसेच आवश्यक ठिकाणी प्रकाशव्यवस्था करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.अपघात झाल्यानंतर उपाययोजना करण्यापेक्षा अपघात होण्यापूर्वीच प्रतिबंधात्मक उपाय करणे गरजेचे आहे. प्रशासनाने या अपघाताची दखल घेऊन Zudio क्रॉसिंगची पाहणी करून तातडीने आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

Previous articleमहाराष्ट्रातील मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरिक्षणाचे सुधारित वेळापत्रक जाहीर
Next articleरेल्वे पोलिसांची तत्परता! हरविलेला मोबाईल शोधून प्रवाशाच्या स्वाधीन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here